New Parliament Inauguration Live: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा, कसा आणि कुठे पाहाल?
New Parliament Inauguration Live: नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकता. सविस्तर जाणून घ्या.
New Parliament Inauguration Live: नवी दिल्ली (New Delhi) येथे नव्या संसद भवनाची (Parliament Building) भव्यदिव्य अशा इमारतीने आकार घेतला आहे. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल. यासाठी संसद भवनात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कसा असणार संपूर्ण सोहळा?
हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये तयारी सुरु आहे. 28 मे रोजी सकाळी तमिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत वैदिक विधींनुसार लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजेच राजदंड लावतील. त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा करण्यात येईल. या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. तसेच उभसभापती हरिवंश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन देखील करतील. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल. तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
कशी आहे ही नवी इमारत?
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.
Parliament Inauguration Live Streaming लाईव्ह सोहळा कुठे पाहाल?
सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सांसद टिव्ही या वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर देखील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सोहळ्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सोहळ्याचे आमंत्रण अनेक राजकिय नेत्यांना दिले आहे. आंध्र प्रदेशचे सत्ताधारी वायएसआरसीपीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी 25 राजकिय पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर 20 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :