एक्स्प्लोर
Advertisement
15 किलो वजनी लोखंडी सिलेंडर लवकरच इतिहास जमा
नवी दिल्ली: आता लवकरच 15 किलोच्या लोखंडी टाकीचा सिलेंडर इतिहास जमा होणार आहे. कारण, इंडियन ऑईलने कंपोजिट मटेरिअलपासून तयार केलेल्या एलपीजी टाक्या वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कंपोजिट मटेरिअलपासून तयार करण्यात आलेल्या सिलेंडर टाक्या वजनाने हलक्या असल्याने, तो हाताळण्यात कोणताही त्रास होणार नाही.
सध्या एलपीजीचा घरगुती सिलेंडरचे वजन 30 किलो असते. यात 15 किलो गॅस आणि 15 किलो लोखंडी टाकीचे वजन असते. पण आता इंडियन ऑईलने हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑईल आता लवकरच 4 किलोची कंपोजिट मटेरिअलने तयार केलेली गॅस सिलेंडर टाकी घरगुती वापरासाठी ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. या सिलेंडर टाकीच्या वापरामुळे गॅस लीक किंवा गॅस चोरीसारख्या घटना कमी होतील असे सांगितले जात आहे.
इंडियन ऑईलचे अध्यक्ष बी अशोक यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ''या नव्या सिलेंडरची ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागणार असून, कारण यासाठी कायद्यामध्ये अनेक बदल करण्याची गरज आहे. मात्र, लवकरच ग्राहकांची वजनदार सिलेंडरपासून मुक्तता होईल हे निश्चित आहे,'' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
शेत-शिवार
राजकारण
क्रीडा
Advertisement