एक्स्प्लोर

Solapur Crime: पावणेदोन लाखांचा मोबाईल, सोनं घेतलं, नंतर म्हणाली बंगला नावावर करा, नर्तिकेच्या नादापायी सोलापुरातील माजी उपसरपंचाने आयुष्य संपवलं

Solapur Crime news: सोलापुरात माजी उपसरपंचाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे प्रकरण, कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तिकेविरोधात गुन्हा दाखल. पावणेदोन लाखांचा मोबाईल अन् प्लॉट घेतला.

Solapur Crime News: सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील सासुर गावात एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा मृतदेह एका कारमध्ये सापडला होता. या प्रकरणी मृताच्या मेहुण्याने पोलिसात फिर्याद दिली असून कला केंद्रात (Kala Kendra Dancer) काम करणाऱ्या एका नर्तिकेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. पूजा गायकवाड असे 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे.

मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्राट गोविंद यांची नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन तिने गोविंदसोबत प्रेमसंबंध ठेवले. वेळोवेळी पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे, जमीन, सोनेनाणे घेतले. मात्र, काही दिवसांपासून ती गेवराई येथील बंगला माझ्या नावावर करा, भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्यासाठी दबाव टाकत होती. असे नाही केल्यास तुमच्याशी बोलणार नाही. तुझ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी नर्तिका पूजा गायकवाड देत होती. यासाठी तिने वारंवार तगादा लावल्याने फिर्यादीचे भावजी गोविंद यास स्वतःच्या पिस्तुलाने कानशिलात गोळी घालून आत्महत्या केली, अशी आरोप फिर्याद लक्ष्मण चव्हाण याने पोलिसांत दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पूजा देविदास गायकवाड हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

गोविंद बर्गे यांचा गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. पोलिसांना मंगळवारी एका कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरु केला होता. तेव्हा पूजा गायकवाड या नर्तिकेचे नाव समोर आले होते. गेल्या काही महिन्यांपासून गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील जवळीक वाढली होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड हिला पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन घेऊन दिला होता. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. गोविंद बर्गे सोमवारी रात्री पूजाची समजूत काढण्यासाठी बार्शी तालुक्यातील ससुरे येथे पूजा गायकवाडच्या घरी गेले होते. यानंतर गावाबाहेर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. गोविंद बर्गे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पोलीस हत्येचा पैलूही पडताळून पाहत आहेत. 

आणखी वाचा

प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Sukhbir Singh Badal : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला; कृपाणने हल्ला करणारा जसपालसिंह कोण?
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget