Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री अचानक पंक्चर गाड्यांची रीघ; तपासात धक्कादायक कारण समोर, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडलीय.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अधून मधून घडणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. दरम्यान अशीच एक अपघाताची (Samruddhi Expressway Accident) धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. यात समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा नागपूरकडून (Nagpur) मुंबईकडे (Mumbai) निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना (Accident News) घडलीय. दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याचे आढळून आलं आहे.
रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार
प्रथमदर्शनी लोकांना असं वाटलं की चोरट्याने हे खिळे ठोकले असावे आणि गाड्या पंक्चर झाल्यानंतर त्यांना लुटण्याचा त्यांचा हा डाव असावा. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती. रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीने हे खिळे ठोकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र या प्रकारानंतर मग प्रश्न असा उपस्थित होतो की रस्त्याचं काम सुरू होतं तर बॅरिगेटिंग का केलं नाही? लोकांच्या गाड्या पंक्चर झाल्यानंतर रात्रीतूनच हे खिळे कसे काय काढून टाकण्यात आले? शिवाय हे खिळे दिवसा काढले असते तर लोकांना होणार नाहक त्रास झाला नसता. सोबतच यामुळे कुणाचा अपघात होऊन प्राण गेले असते तर त्याला जवाबदार कोण? समृद्धी महामार्गावरून सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या या मनस्तापालाही जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्याने विचारले जात आहे. दरम्यान या प्रकरणी आता संबंधित प्रशासन नेमकं काय कारवाई करतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दहिसर टोलनाका स्थलांतरित होणार, वाहतूक कोंडीतून सुटका होणार
मुंबईतील दहिसर टोलनाका आता वर्सोवा पुलासमोर स्थलांतरित होणार आहे. टोलनाक्यामुळे दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, तसेच वायू प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला होता. यामुळे दहिसर टोलनाका इतरत्र हलवण्याची मागणी रहिवासी करत होते. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत दहिसर टोलनाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ हलवण्याचे आदेश MSRDC ला देण्यात आले. दिवाळीपर्यंत टोलनाक्याचे स्थलांतर पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. "दिवाळीपूर्वी तो टोलनाका पुढे सरकराचे निर्देश आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे," असे सांगण्यात आले. या निर्णयामुळे दिवाळीपासून दहिसर ते मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदर ते अंधेरी प्रवास सुकर होणार असून वाहतूक कोंडी दूर होईल
आणखी वाचा

























