एक्स्प्लोर
दक्षिण-मध्य रेल्वेच्या विनाआरक्षित तिकिटांसाठी मोबाईल अॅप
जर प्रवाशाला विनाआरक्षित तिकीट काढून प्रवास करायचा असेल, तर असा प्रवाशी या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करु शकतो. आजवर केवळ आरक्षित तिकिटच ऑनलाईन बुक करण्याची सोय उपलब्ध होती.

प्रातिनिधिक फोटो
नांदेड : विनाआरक्षित प्रवास करायचा म्हटलं की रेल्वेस्टेशनवर तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण आता दक्षिण-मध्य रेल्वेने लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित केले आहे. यूटीएस नावाचे हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे.
जर प्रवाशाला विनाआरक्षित तिकीट काढून प्रवास करायचा असेल, तर असा प्रवाशी या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करु शकतो. आजवर केवळ आरक्षित तिकिटच ऑनलाईन बुक करण्याची सोय उपलब्ध होती.
रेल्वेस्थानकाच्या 15 मीटर अंतरापासून ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर असताना या अॅपद्वारे विनाआरक्षित तिकीट बुक करता येणार आहे. या अॅप मुले लोकांना रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही, सुट्ट्या पैसे नसल्यास डोकेदुखी होणार नाही, शिवाय हे सर्व पेपरलेस असल्याने तिकीट हरवण्याचा धोका नाही.
दरम्यान, हे अॅप दक्षिण-मध्य रेल्वेने तयार केले असल्याने सध्या याचा वापर फक्त दक्षिण मध्य रेल्वेच्या स्थानकापुरताच करता येणार आहे. अन्य विभागातील रेल्वेस्थानकांसाठी सध्या तिकीट बुक करता येणार नाही.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
बातम्या
विश्व
Advertisement
Advertisement


















