एक्स्प्लोर
Advertisement
भारताच्या नीरज चोप्राचा विश्वविक्रम
मुंबई : नीरज चोप्राने पोलंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड अथलेटिक्स स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. 18 वर्षीय भालाफेकपटू नीरजने भारताला वर्ल्ड अथलेटिक्स स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून दिलं आहे.
पोलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर 20 चॅम्पियन स्पर्धेमध्ये त्याने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. या स्पर्धेत नीरजने 86.48 मीटर लांब भाला फेकून लॅटेवियाच्या जिगिमुंडस सिर्यमस याचा 84.69 मीटरचा विक्रम मोडित काढला आहे.
या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात नीरजने 79.66 मीटर लांब भाला फेकला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळाले. या आधी फेब्रुवारी 2016 मध्ये गुवाहाटीत झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement