एक्स्प्लोर
देशभरात ईदचा उत्साह, राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या शुभेच्छा
ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली.

मुंबई : आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईद. भारतात शनिवारी ईद साजरी केली जाईल, अशी घोषणा दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम, इमाम बुखारी यांनी शुक्रवारी संध्याकाळी केली. शुक्रवारी रात्री 7.35 च्या सुमारास चंद्रदर्शन झाल्याचं इमाम बुखारी यांनी सांगितलं.
ईद उल फित्रच्या निमित्ताने शुक्रवारी रात्रीच देशातील प्रमुख बाजारांमध्ये गजबज पाहायला मिळाली. चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी करण्यात येण्याची घोषणा होताच, बाजारात लोकांची गर्दी वाढली.
मुंबईसह देशभरात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या मिनारा मशिदीतही नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. रमजान ईदची सुरुवात ईदच्या नमाजाने होते. सर्व मुस्लीम पुरुष नवे कपडे परिधान करुन ईदच्या नमाजासाठी ईदगाह किंवा मशिदीत जातात. नमाजानंतर लोक एकमेकांची गळाभेट घेऊन ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देतात.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील सर्व मुस्लीम बांधवांना ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या संदेशात ते म्हणाले की, "ईद-उल-फित्रच्या निमित्ताने मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषत: देश आणि परदेशात राहणाऱ्या सर्व मुस्लीम बांधव आणि भगिनींना शुभेच्छा देतो. रोजानंतर पवित्र रमजान महिन्याचा उत्सहाने समारोप होत आहे. समाजात बंधुभाव आणि सामंज्यस वाढो, अशी प्रार्थना करतो."
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. "समाजातील एकता आणि एकोपा टिकून राहो, अशी प्रार्थना करतो," असं मोदींनी संदेशात म्हटलं आहे.सभी देशवासियों, खास तौर से देश और विदेश के हमारे मुस्लिम भाइयों और बहनों को ईद मुबारक। यह शुभ दिन आप सब के परिवारों के लिए खुशियां और जश्न लाए और हमारे साझा समाज में भाईचारे, आपसी सौहार्द और मेल-मिलाप को मज़बूत बनाए — राष्ट्रपति कोविन्द
— President of India (@rashtrapatibhvn) June 16, 2018
Eid Mubarak! May this day deepen the bonds of unity and harmony in our society. https://t.co/lSeBAUc6JW
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
