PM Security : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच सहभागी होणार Mudhol hound श्वान
Karnataka News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच सहभागी होणार Mudhol hound श्वान.
Karnataka News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच देशी श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकातील मुधोल हाउंड (Mudhol hound) डॉग पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात दिसणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या पथकात या शिकारी श्वानांचा समावेश करण्यात येणार आहे.
दिल्लीत दोन श्वान दाखल
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन डॉक्टर आणि सैनिकांची एसपीजी दोन डॉक्टर आणि सैनिकांचा समावेश असलेले एसपीजीचे एक पथक 25 एप्रिल रोजी कॅनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर, (मुधोळ हाउंड), तिम्मापूर येथे आले होते. तिथून दोन मेल श्वान घेतले आहेत. मुधोल हाउंड ही एसपीजी पथकात समाविष्ट केलेली पहिली देशी श्वानांची प्रजाती आहे. सूत्रांनी सांगितलं की, डॉ बीएन पंचबुद्धे आणि प्रशिक्षकांच्या टीमनं बागलकोट जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधला होता, त्यानंतर ही प्रक्रिया करण्यात आली.
ट्रेनिंग सुरु
दोन महिन्यांपूर्वीच ट्रेनिंग सुरु करण्यात आली आहे. सर्वात आधी श्वानांना चार महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांना सुरक्षेसाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मात्र, या प्रकरणाची संवेदनशीलता पाहता अधिकारी याबाबत मौन बाळगून आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकानं तामिळनाडूतील राजापालयम श्वानांच्या प्रजातीचा विचार करून मुधोल हाऊंडची निवड केली आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील रामपूर ग्रेहाऊंडची निवड केली आहे.
मन की बातमध्ये पंतप्रधानांनी केलेली चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी मुधोल हाउंड प्रजातीच्या श्वानांचा उल्लेख मन की बातमध्ये केला होता. ते म्हणाले होते की, "जर या प्रजातीच्या श्वानांना घरातही पाळलं तर भारतीय प्रजातींना प्रोत्साहन मिळेल आणि स्वावलंबी भारत घडवण्यासाठी ते आवश्यक आहे, असं ते म्हणाले होते.
मुधोल हाउंड प्रजातीची वैशिष्ट्य
मुधोल प्रजातीचे श्वान फार पूर्वीपासूनच शिकारी वापरत आहेत. दुबळं, लांब शरीर आणि लहान डोकं ही या प्रजातीची वैशिष्ट्य आहेत. मुधोल हाऊंड प्रजातीच्या श्वानांची गंध घेण्याची क्षमता सर्वाधिक असते. तसेच या प्रजातीचे श्वान लगेच थकत नाहीत. अजिबात न थकता हे श्वान बराच काळ धावतात. ते 72 सेंटीमीटर पर्यंत वाढतात आणि त्यांचं वजन 20 ते 22 किलोग्रॅम दरम्यान असतं.