एक्स्प्लोर

NCRB Report:  सर्वाधिक हत्यांचे गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?  NCRB आकडे समोर 

NCRB Report:  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थातच  NCRB नुकतीच आकडेवारी जाहीर केली असून 2022 या वर्षात उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या झाल्या असल्याचा खुलासा करण्यात आलाय. 

मुंबई : गेल्या वर्षी 2022 मध्ये देशभरात 28,522 हत्येच्या (Murder) गुन्ह्यांमध्ये (Crime) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्या असल्याचा खुलासा एनसीआरबीच्या आकडेवारीतून झाला आहे.  याचाच अर्थ, दररोज 78 प्रकरणे किंवा तासाला 3 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सर्वाधिक हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. उत्तर प्रदेशात एकूण 3,491 गुन्ह्यांची नोंद झालीये. उत्तर प्रदेशानंतर बिहार (Bihar) दुसऱ्या स्थानी आहे. तसेच या यादीमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एनसीआरबीने सांगितले की 2021 मध्ये 29,272 आणि 2020 मध्ये 29,193 प्रकरणे नोंदवली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या NCRB च्या वार्षिक गुन्हे अहवालाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये हत्येचे सर्वात मोठे कारण 'वाद' होते. देशातील 9, 962 प्रकरणांमध्ये हत्येचे कारण 'वाद' होते. यानंतर 3,761 प्रकरणांमध्ये 'वैयक्तिक सूड किंवा शत्रुता' आणि 1,884 प्रकरणांमध्ये 'लोभापायी' हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. 

उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद

2022 मध्ये उत्तर प्रदेशात  सर्वाधिक हत्येच्या एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशात या प्रकरणांमध्ये 3,491 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. यानंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर असून इथे 2,930 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच महाराष्ट्र या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून 2,295 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात 1,978 आणि राजस्थानमध्ये 1,834 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झालीये. देशभरातील एकूण हत्येच्या गुन्ह्यांपैकी  43.92 टक्के गुन्ह्यांची नोंद या पाच शहरांमध्ये झालीये. 

ईशान्येकडील 'या' राज्यांत हत्येच्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी

एनसीआरबीने दिलेल्या आकडेवारीनुसार ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमी हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. यामध्ये सिक्कीमध्ये 9, नागालँडमध्ये 21, मिझोराममध्ये 31 आणि मणिपूरमध्ये 47 गुन्ह्यांची नोंद झालीये. त्याचप्रमाणे भारतातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोवा राज्यात देखील 44 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. 

दिल्लीत मागील वर्षी 509 गुन्हे दाखल

केंद्रशासित प्रदेशांमधील गुन्हेगारी प्रकरणांबद्दल बोलायचे तर दिल्लीत 2022 वर्षात हत्येचे 509 गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यापाठोपाठ जम्मू आणि काश्मीरमध्ये 99, पुद्दुचेरीत 30, चंदीगडमध्ये 18,  दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 16, अंदमान आणि निकोबार बेटे 7, लडाख 7, लक्षद्वीपमध्ये शून्य हत्येच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. 

झारखंडमध्ये सर्वाधिक हत्येच्या गुन्ह्यांची नोंद

2022 मध्ये संपूर्ण भारतात खुनाचे प्रमाण पाहिले तर झारखंडमध्ये ते सर्वाधिक 4 टक्के आहे. यानंतर अरुणाचल प्रदेश 3.6 टक्के, छत्तीसगड आणि हरियाणा 3.4 टक्के, आसाम 3 टक्के आणि ओडिशा 3 टक्के अशी या गुन्ह्यांची टक्केवारी आहे. 

NCRB नुसार, हत्येच्या या प्रकरणांमध्ये पीडितांपैकी 8,125 महिला आणि 9 तृतीयपंथी व्यक्ती होत्या. त्याचप्रमाणे जवळपास 70 टक्के पुरुषांचा या आकडेवारीमध्ये समावेश आहे. 

हेही वाचा :

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; आरोपीच्या अटकेसाठी पैठणमध्ये मोर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवालYuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget