(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nisar Satellite : नासाकडून भारतात पोहोचला 'निसार' उपग्रह, नैसर्गिक आपत्तींची मिळणार आगाऊ माहिती; 2024 मध्ये लॉन्च होणार सॅटेलाईट
Nisar Satellite in India : नासाने 'निसार' हा सॅटेलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे. या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
ISRO NASA Space Mission 2024 : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने (NASA) 'निसार सॅटेलाईट' (Nisar Satellite) इस्त्रोकडे (ISRO) सोपवला आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानाने हे निसार उपग्रह भारतात आणण्यात आला आहे. यूएस एअर फोर्सचं C-17 विमान बुधवारी (8 मार्च) बेंगळुरूमध्ये उतरलं. या विमानातून NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) कडे सुपूर्द करण्यात आलं आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये हा मैलाचा दगड मानला जात आहे. नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था संयुक्तपणे हा उपग्रह तयार करत आहे.
भारतात पोहोचला 'निसार' सॅटेलाईट
भारतीय अवकाश संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच, इस्त्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA) यांच्याकडून संयुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत निसार उपग्रह तयार करण्यात येत आहे. 2024 मध्ये हे सॅटेलाईट लाँच करण्यात येईल. नासाने 'निसार' हा सॅटेलाईट इस्रोकडे सुपूर्द केला आहे. या उपग्रहामुळे आता जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Touchdown in Bengaluru! @ISRO receives NISAR (@NASA-ISRO Synthetic Aperture Radar) on a @USAirforce C-17 from @NASAJPL in California, setting the stage for final integration of the Earth observation satellite, a true symbol of #USIndia civil space collaboration. #USIndiaTogether pic.twitter.com/l0a5pa1uxV
— U.S. Consulate General Chennai (@USAndChennai) March 8, 2023
2024 मध्ये लाँच होईल निसार सॅटेलाईट
नासाने (NASA) 'निसार उपग्रहाचं' (Nisar Satellite) पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केलं असून हा उपग्रह पुढील काम आणि लाँचिगसाठी इस्त्रोकडे पाठवण्यात आला आहे. आता इस्त्रो यावर काम करेल, त्यानंतर 2024 मध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण पार पडणार आहे. अमेरिकन वाणिज्य दूतावासाचे अधिकारी (US Consulate General) यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "निसार उपग्रह बंगळुरू येथे दाखल झाला. इस्रोकडे नासाकडून कॅलिफोर्नियातीहून रवाना झालेला उपग्रह पोहोचला आहे. अमेरिकन वायुसेनेच्या C-17 विमानानं हो उपग्रह भारतात नेण्यात आला. हा दोन देशांमधील अंतराळ सहकार्याचा एक भाग आहे असून याचच एक प्रतीक. "
नैसर्गिक आपत्तींची मिळणार आगाऊ माहिती
निसार उपग्रह (NISAR Satellite) हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल. याचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्रं शोधणे तसेच कृषी क्षेत्रासह विविध कारणांसाठी केला जाईल. सर्वकाही सुरळीत पार पडलं तर, निसार उपग्रह 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लाँच करण्यात येईल. हा उपग्रह किमान तीन वर्षे काम करेल. निसार उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा नकाशा तयार करणार आहे.
NISAR Satellite : भारत-अमेरिकेच्या मैत्रीचं आणखी एक उदाहरण; ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान