एक्स्प्लोर
नितीन गडकरी म्हणजे श्रावणबाळ : नरेंद्र मोदी
डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट श्रावणबाळाशी केली आहे. उत्तराखंडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी आज चारधाम हायवे प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर डेहराडून आयोजित सभेला संबोधताना पंतप्रधान मोदींनी गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली.
जनतेला संबंधित करताना मोदी म्हणाले की, "हा महामार्ग बनल्यानंतर ज्या ज्या वेळी केदारनाथ आणि बद्रीनाथला याल, त्या त्या वेळी तुम्ही या सरकारची आणि नितीन गडकरींची आठवण काढाल, जशी श्रावणबाळाची काढता."
"सभेला एवढ्या लोकांची हजेरी पाहून असंच वाटतं की उत्तराखंड आता विकासासाठी आणखी प्रतीक्षा करणार नाही. उत्तरखंडमधील महाप्रलयात प्राण गमावलेल्यांना हा महामार्ग समर्पित आहे. या हायवेवर कोणत्याही वातावरणाचा परिणाम होणार नाही. हा ऑल वेदर हायवे प्रोजेक्ट आहे, जो चारधामांना एकमेकांशी जोडेल," असं मोदी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement