Diwali Bonus : केंद्र सरकारच्या 'या' विभागाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय
Indian Railway Employee Bonus : दिवाळी आणि छठपुजेपूर्वी केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट दिली असून मोठा बोनस जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे खात्यातील (Indian Railway) कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narndra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे कर्मचारी, बिहार आणि शिपबिल्डिंग क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस (Diwali Bonus) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दिवाळी आणि छठपुजेपूर्वी लाखो कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळाली आहे.
Railway Employee Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस
सरकारने 10.91 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाएवढा बोनस मंजूर केला आहे. यासाठी एकूण 1,865.68 कोटी रुपये खर्च होणार असून कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच रक्कम जमा होईल. हा लाभ ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, गार्ड, स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, हेल्पर, पॉइंट्समन आणि इतर ग्रुप C कर्मचार्यांना मिळणार आहे.
Bihar Development : बिहारमध्ये रेल्वे डबल लेन
मंत्रिमंडळाने बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिलैया रेल्वे मार्गाचे डबल लेन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 2,192 कोटी रुपये खर्च करून 104 किमी लांबीचा हा प्रकल्प उभारला जाईल. यामुळे नालंदा, राजगीर (शांती स्तूप), पावापुरी, गया आणि नवादा जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढेल. पर्यटनालाही चालना मिळेल.
बिहारमधील NH-139W च्या साहेबगंज-अरेराज-बेतिया या 78.942 किमी लांबीच्या महामार्ग प्रकल्पालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. या प्रकल्पावर 3,822.31 कोटी रुपये खर्च होणार आहे.
Ship Building Development : शिपबिल्डिंग क्षेत्राला बळ
देशातील शिपबिल्डिंग आणि मरीन फायनान्सिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ₹69,725 कोटींच्या पॅकेज ला मंजुरी देण्यात आली. यात चार उपक्रमांचा समावेश आहे –
- शिपबिल्डिंग फायनान्शियल असिस्टन्स स्कीम
- मेरीटाइम डेव्हलपमेंट फंड
- शिपबिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम
- लीगल, पॉलिसी आणि प्रोसेस सुधारणा
- वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी वाढ
MBBS च्या पाच हजार जागा वाढवणार
मेडिकल विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 5,000 नवीन पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सीट्स आणि 5,023 नवीन MBBS सीट्स वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढणार असून आरोग्य सेवेत मनुष्यबळाची मोठी भर पडेल. केंद्र सरकारच्या या सर्व निर्णयांमुळे रेल्वे कर्मचारी, बिहारमधील नागरिक, शिपबिल्डिंग उद्योग आणि वैद्यकीय विद्यार्थी यांना थेट फायदा होणार आहे.
ही बातमी वाचा:























