एक्स्प्लोर

Mukesh Ambani : मुकेश अंबानींचे आता 'नमस्ते लंडन'! विकत घेतला 49 बेडरूमचा अलिशान महल 

अंबानींनी (Mukesh Ambani) खरेदी केलेल्या या अलिशान महलामध्ये 49 बेडरूम्स असून जेम्स बॉन्ड (James Bond) चित्रपटाच्या मालिकेतील दोन चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलं आहे.

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता लंडनवासी होणार असल्याचे संकेत आहेत. इंग्रजी वृत्तपत्र 'मिड डे' ने दिलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी लंडनमधील बकिंगहॅमशायरमधील स्टोक पार्क (Buckinghamshire, Stoke Park) या ठिकाणी 300 एकरची जागा विकत घेतली असून त्या ठिकाणी रहायला जाणार आहेत. या परिसरात एक ऐतिहासिक वास्तू असून त्या ठिकाणी अंबानी परिवार आता वास्तव्यास असेल. तब्बल 49 बेडरूम्स असलेला स्टोक पार्कमधील हा महल मुकेश अंबानींनी 592 कोटी रुपये देऊन खरेदी केल्याचं वृत्त आहे. 

कसा आहे हा अलिशान महल? 
अंबानींनी खरेदी केलेल्या या अलिशान महलामध्ये 49 बेडरूम्स आहेत. या महलात एक मिनी हॉस्पिटल असून ते सुसज्ज सोईंनी युक्त आहे. ही वास्तू खुल्या वातावरणात आहे. ही वास्तू खूप जुनी असून 1908 सालापर्यंत ती खासगी मालमत्ता होती. त्यानंतर या वास्तूचे एका क्लबमध्ये रुपांतर करण्यात आलं. यामध्ये अलिशान हॉटेल आहे. तसेच या वास्तुच्या आवारात एक गोल्फ क्लबदेखील आहे. 

या महलात मंदिराची निर्मिती केली जाणार
या वास्तूमध्ये जेम्स बॉन्ड चित्रपटाच्या मालिकेतील दोन चित्रपटांचे शूटिंग करण्यात आलं आहे. अंबानी कुटुंबीय या नवीन घरामध्ये एका मंदिराची निर्मिती करणार असून मुंबईतील दोन पुजाऱ्यांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नवीन महलात गणपती, राधा-कृष्ण आणि हनुमानाची मूर्तीही बसवण्यात येणार आहे. 

अंबानी कुटुंबियांनी या वर्षीची दिवाळी स्टोक पार्कमधील या नव्या महलात साजरी केल्याची माहिती आहे. आता अंबानी कुटुंबीय परत भारतात येणार असून पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ते या नवीन घरी कायम स्वरुपी वास्तव्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. 

कोरोना काळात मुंबईतील अॅन्टिलियामध्ये आणि नंतर जामनगरमध्ये अंबानी कुटुंब वास्तव्यास होतं. जामनगरमध्ये अंबानी समूहाची रिफायनरी आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget