MP Blast : मोठी दुर्घटना! हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 25 हून अधिक जण होरपळले
MP Blast : मोठी दुर्घटना! हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 25 हून अधिक जण होरपळले
Harda Fire News : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदामध्ये (Harda) फटाक्याच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट (Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुघर्टनेत 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एख अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा लोळ आजूबाजूच्या परिसरात पसरला आहे. कारखान्यात आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एक-दोन नाही तर, कारखान्यामध्ये सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे उंचच उंच आगीचे लोट उठत आहेत. या कारखान्यात काम करणारे अनेक कामगार कारखान्यात अडकलेले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या आगीत आतापर्यंत 25 होरपळले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
25 हून अधिक जण होरपळले
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत सांगितलं आहे की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून हरदा येथील आगीच्या घटनेसंदर्भात माहिती घेतली आहे.
#WATCH | Madhya Pradesh: People injured in the massive fire that broke out in a firecracker factory in Harda, are being shifted to a hospital for treatment. Fire tenders have reached the spot, several people are feared trapped. pic.twitter.com/rwEzdIUUJX
— ANI (@ANI) February 6, 2024
फटाक्यांच्या अवैध कारखान्यात स्फोट
हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. कारखान्याच्या आजूबाजूला रस्त्यावर काही मृतदेह पडलेले दिसतात. 25 हून अधिक जखमींना हरदा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने 100 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. स्फोटाच्या धडकेमुळे वाहनासह अनेक पादचारी दूर फेकले गेले. कारखान्यात अधूनमधून स्फोट होत आहेत.
अनेक कामगार आत अडकल्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, हरदा येथील बैरागढ येथील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. बैरागड येथील मगरधा रोडवरील अवैध फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला आहे. अनेक लोक आत अडकल्याची शक्यता आहे, त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.