एक्स्प्लोर
मोटार वाहन कायदा सुधारणा विधेयकाची लोकसभेत परीक्षा

नवी दिल्ली : मोटार वाहन कायदाच्या सुधारणा विधेयकाला आज लोकसभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. हलगर्जीने गाडी चालवल्यामुळे बालकाचा मृत्यू झाल्यास तीन लाख रुपयांपर्यत दंड आणि किमान सात वर्षांच्या कारावासाची तरतूद नव्या मोटार विधेयकात आहे. तसंच विविध प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाईल. सुधारित कायद्यानुसार मद्यपी वाहनचालकांकडून पाचपट जास्त दंड वसूल केला जाणार आहे. दंडाची रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत पोहचणार आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर न केल्यास 2500 रुपये, वाहतुकीचे नियम तोडल्यास 1000 रुपये, सीट बेल्टचा वापर न केल्यास 1000 रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 5000 रुपये दंड वसूल केला जाईल.
मद्यप्राशन करुन वाहन चालवलं तर पाचपट दंड!
गेल्या आठवड्यातच मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्यास केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं परवानगी दिली आहे. भारतातील रस्त्यांवर दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात घडतात. तर दीड लाखांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागतात. या पार्श्वभूमीवर या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.आणखी वाचा























