Morning Headlines 06 August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Chandrayaan-3 Mission : 'मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवतंय', चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान-3 चा इस्रोला पहिला संदेश; 'या' दिवशी चंद्रावर उतरणार
ISRO Chandrayaan-3 Mission : इस्रोच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. वाचा सविस्तर
2. Gyanvapi Survey : ज्ञानवापीच्या तळघरात हिंदू देवतांच्या खंडित मूर्ती आणि त्रिशूळ, हिंदू पक्षाचा दावा; सर्वेक्षणात आणखी काय सापडलं?
Gyanvapi Mosque ASI Survey : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या ASI (Archaeology Survey Of India) परिसरात पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात मूर्ती सापडल्याचा दावा हिंदू पक्षांनी केला आहे. ज्ञानवापी परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजता सर्वेक्षणाला सुरुवात झाली. कडेकोट बंदोबस्तात, एएसआयची टीम आली आणि मुख्य आवारातून घुमट, व्यासजी तळघर आणि इतर भागात जाऊन तपास केला. तळघर सर्वेक्षणादरम्यान अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. तळघरात खंडीत मूर्ती, त्रिशूळ आणि भिंतींवर कमळाच्या कलाकृती सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने दावा केला आहे. वाचा सविस्तर
3. Haryana Violence : पाकिस्तानातून हरियाणामध्ये हिंसाचार भडकावणारा झीशान मुश्ताक कोण आहे? वाचा सविस्तर
Haryana Violence Pakistan Connection : हरियाणात (Haryana Violence) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या ब्रज मंडल यात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. पोलिस तपासात एका पाकिस्तानी यूट्यूबरचे नाव समोर आले, ज्याने व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. वाचा सविस्तर
4.Weather Update : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; वाचा IMD चा अंदाज
Weather Update Today : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने (Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानुसार (IMD), पुढील 4-5 दिवसांत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्येत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
5. Army Agniveer : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड, एकूण 756 अग्निवीरांनी घेतली शपथ
Army Agniveer : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड शनिवारी, 5 ऑगस्ट रोजी जाट रेजिमेंटल सेंटर बरेलीच्या बक्षी परेड मैदानावर पार पडली. शीख रेजिमेंटच्या अग्निवीरांनी झारखंडमधील रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पासिंग आऊट परेडचे आयोजन केले होते. वाचा सविस्तर
6. Imran Khan : हत्येचा प्रयत्न, तब्बल 150 केसेस अन् दोनदा जेलवारी; पाकिस्तानच्या राजकारणात इम्रान खान यांचा करेक्ट कार्यक्रम कसा झाला?
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एका पंतप्रधानाला जेलमध्ये टाकण्याचा पराक्रम पाकिस्तानातील रक्तरंजित राजकारणाने झाला आहे. वाचा सविस्तर
7. PM मोदींच्या हस्ते आज 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन; राज्यातील 44 स्थानकांचा समावेश
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे (Redevelopment projects of Railway Stations) भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. वाचा सविस्तर
8. 6th August In History: भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म, हिरोशिमावर अणुबॉम्ब हल्ला; इतिहासात आज
6th August In History: इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आजच्या दिवशी जगात पहिल्या अणुबॉम्बचा वापर करण्यात आला होता. जपानची राजधानी हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, यामुळे असंख्य लोक मृत्यूमुखी पडले. भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म देखील आजच्याच दिवशी झाला होता. तर दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन आजच्या दिवशीच झालं. या व्यतिरिक्त आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा सविस्तर
9. Horoscope Today 06 August 2023 : वृषभ, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 06 August 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होईल, तर कन्या राशीच्या लोकांचा दिवस खूप शुभ राहील. तूळ राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर