Morning Headlines 2nd July : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट
इलॉन मस्क (Elon Musk) यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर (Twitter) कायम चर्चेत राहिलं आहे. आता इलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटरवर दिवसाला पोस्ट वाचण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट वाचण्यावर सध्या तात्पुरत्या मर्यादा घालण्यात आल्या आहे. (वाचा सविस्तर)
परफ्यूम बॉटलमध्ये बॉम्ब, लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेसंबंधित एकाला अटक
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित एकाला परफ्यूम आरडी बॉम्बसह अटक (Perfume Ied) करण्यात आल आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एका साथीदाराला शनिवारी, 1 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे. (वाचा सविस्तर)
उत्तर भारतात जोरदार पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत
देशाच्या विविध भागात पावसानं जोरदार (Heavy rain) हजेरी लावली आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार देशात सात जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (वाचा सविस्तर)
अॅपलची चिप पुरवठादार TSMC चा डेटा चोरीला गेल्याचं स्पष्ट; हॅकर्सकडून 574 कोटींच्या खंडणीची मागणी
जगप्रसिद्ध अॅपल कंपनीची चिप पुरवठादार असलेल्या तैवान सेमिकंडक्टर मॅन्यूफॅक्चरींग कंपनीचा डेटा चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. टीएसएमसी या चिप उत्पादक कंपनीच्या डेटाची चोरी करणाऱ्या गँगचं नाव लॉकबिट रॅन्समवेअर असून ती रशियातील असल्याचं सांगितलं जातं. लॅाकबिट रॅन्समवेअर गँगने TSMC च्या डेटा चोरीची माहिती उघडकीस केल्यावर आता TSMC ने देखील डेटा चोरी झाल्याचे मान्य केले आहे. (वाचा सविस्तर)
अर्थव्यवस्थेसाठी चांगली खबर, GST कलेक्शन 1.61 लाख कोटींहून जास्त, 12 टक्के वाढीची नोंद
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची बातमी असून जूनमधील जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढून 1.61 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. विशेष बाब म्हणजे सहा वर्षांपूर्वी 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यापासून चौथ्यांदा एकूण कर संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. (वाचा सविस्तर)
बंगालचा नवाब सिराज-उद- दौलाची हत्या, शिमला करारावर भारत-पाकिस्तानची स्वाक्षरी
भारताच्या इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. आजच्याच दिवशी ब्रिटिशांनी कपटाने पराभव केलेल्या बंगालच्या शेवटचा नवाब सिराज-उद- दौलाची हत्या करण्यात आली होती. त्याचसोबत समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेरअली यांचं निधनही आजच्याच दिवशी 1950 साली झालं होतं.
(वाचा सविस्तर)
मेष, कर्क, धनु, मीन राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार उद्या मेष राशीच्या ज्येष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा ठेवा. कन्या राशीच्या मित्रांसह हँग आउट करा जे सकारात्मक आणि उपयुक्त आहेत. मेष ते मीन राशीसाठी रविवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या उद्याचे राशीभविष्य (वाचा सविस्तर)