एक्स्प्लोर

Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेदरम्यान मोठा कट उधळला! परफ्यूम बॉटलमध्ये बॉम्ब, 4 आयईडीसह लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक

Let Associate Arrested : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेसंबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून परफ्युम आयडी जप्त करण्यात आले आहेत.

Jammu Kashmir News : अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादाचा मोठा कट उधळण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंधित एकाला परफ्यूम आरडी बॉम्बसह अटक (Perfume Ied) करण्यात आल आहे. लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या एका साथीदाराला शनिवारी, 1 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून परफ्यूमच्या बॉटलमधील बॉम्ब सापडले आहेत. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरच्या पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

लष्कर-ए-तोएबा संबंधित एकाला अटक

सैन्य दलाने श्रीनगरमधील बटमालू बसस्थानकावरून दहशतवादी संघटनेसंबंधित एका साथीदाराला अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपीकडून चार परफ्यूम आयईडी (Improvised Explosive Device) सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर अहमद इट्टू असं आरोपीचं नाव असून तो कैमोह येथील गुलशनाबादचा रहिवासी आहे. 

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बटामालू बसस्थानकाजवळून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. दहशतवाला अटक करण्यात आल्यामुळे मोठा कट उधळून लावण्यात प्रशासनाला यश आलं आहे. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 3/5 सह संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध बटामालू पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 1 जुलैपासून वार्षिक अमरनाथ यात्रा सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या प्रचंड सुरक्षा ग्रिड तैनात आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा जवानांची करडी नजर आहे.

यापूर्वीही परफ्यूम आयईडी जप्त

या आधीही परफ्यूम आयईडी बॉम्ब जप्त करण्यात आला होता. 2 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका सरकारी शाळेतील शिक्षकाकडून परफ्यूम आयईडी जप्त करण्यात आला होता. हा आरोपी लष्कर-ए-तोएबा संबंधित असल्याचं समोर आलं होतं. 

अनेक स्फोटांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफ असं आरोपीचं नाव आहे. वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बससह अनेक स्फोट घडवण्यात आरोपीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यानंतर परफ्यूम आयईडीबद्दल सांगताना जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, पोलिसांनी जप्त केलेला हा पहिलाच आयईडी आहे. आयईडी दाबण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याचा स्फोट होतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Embed widget