एक्स्प्लोर

Morning Headlines 11th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. रेल्वे सुरक्षेसाठीचा केंद्राचा विशेष निधी फूट मसाजर, क्रॉकरी अन् फर्निचरसाठी खर्च; कॅगच्या अहवालात खळबळजनक खुलासा

New Delhi : रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी (RRSK) या विशेष निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कॅगच्या अहवालात (CAG Report) करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी (RRSK) या विशेष निधीतून फूट मसाजर, क्रॉकरी, इलेक्ट्रिकल उपकरणं, फर्निचर, हिवाळ्यातील जॅकेट, कॉम्प्युटर आणि एस्केलेटर खरेदी करण्यासाठी, उद्यानं विकसित करणं, शौचालयं बांधणं, वेतन आणि बोनस देण्यासाठी करण्यात आला. वाचा सविस्तर 

2. Biparjoy Cyclone : बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना धोका

Weather Update : बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 'बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.' वाचा सविस्तर 

3. Weather Updates: देशात कुठं उन्हाचा चटका तर कुठं पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र, सर्वच ठिकाणी अद्याप पावसानं हजेरी लावली नाही. देशातील काही भागात सध्या उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. तर काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये कडक उन्हाने लोकांना हैराण केले आहे. येत्या आठवडाभरातही उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. वाचा सविस्तर 

4. NCERT Textbook Modification Issue: "पुस्तकातून आमची नावं काढून टाका..."; योगेंद्र यादव अन् सुहास पळशीकर यांची मागणी, NCERT म्हणतंय, ते शक्य नाही, प्रकरण नेमकं काय?

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCRT) पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांमुळे सुहास पळशीकर (Suhas Palshikar) आणि योगेंद्र यादव (Yogendra Yadav) दोघेही नाराज आहेत. दोघांनी NCERT ला पत्र लिहून पुस्तकांमध्ये 'एकतर्फी आणि अतार्किक' काटछाट केल्याचा आरोप केला आहे. मुख्य सल्लागार म्हणून त्यांचं नाव राज्यशास्त्राच्या पुस्तकातून वगळण्यात यावं, असंही दोघांनी या पत्रात म्हटलं आहे. तर एनसीईआरटीचं याबाबत म्हणणं आहे की, एखाद्याची संलग्नता काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तके दिलेल्या विषयावरील ज्ञान आणि आकलनाच्या आधारे विकसित केली जातात आणि कोणत्याही स्तरावर वैयक्तिक लेखकत्वाचा दावा केला जात नाही. दरम्यान, सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव हे इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्राच्या मुख्य पुस्तकांसाठी मुख्य सल्लागार आहेत. वाचा सविस्तर 

5. Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा सरकारला अल्टिमेटम! ...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही : साक्षी मलिक

Wrestlers Protest : गेल्या काही महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी आता सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत कुस्तीपटूंचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आशियाई खेळात (Asian Games) सहाभागी होणार नाही, असं वक्तव्य साक्षी मलिक हिनं केलं आहे. भाजपचे खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप काही महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे. वाचा सविस्तर 

6. Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज

Opposition Unity:  2024 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत फक्त त्या पक्षांना बोलावण्यात आले आहे, जे आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील. विरोधी पक्षांच्या एकजुटीला निवडणूकपूर्व आघाडी म्हटले जात आहे. वाचा सविस्तर 

7. Indian Navy : अवकाशाला गवसणी, भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन

Indian Navy : भारतीय नौदलाने बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांच्या समन्वित तैनातीसह आपल्या प्रचंड सागरी सामर्थ्याचे दर्शन घडवले. नौदलाच्या सामर्थ्याचे हे प्रदर्शन भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण, प्रादेशिक स्थैर्य राखण्यासाठी आणि सागरी क्षेत्रामध्ये सहकारी भागीदारी वाढवण्याची कटिबद्धता अधोरेखित करते. हिंद महासागरात आणि त्यापलीकडे सागरी सुरक्षा, उर्जा-प्रक्षेपण वाढवण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वाचा सविस्तर 

8. ChatGPT : तुमसे ना हो पायेगा... सॅम अल्टमन यांचं भारतीयांना आव्हान, म्हणतात, 'भारत आमची बरोबरी करु शकत नाही'

Sam Altman about India : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) काही दिवसांपूर्वी भारत (India) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. तसेच, भारतीयांनी ChatGPT ला प्रोत्साहन दाखवल्याबाबत कौतुकही केलं. पण या सोबतच त्यांनी भारतीयांना एक नवं आव्हान दिलं आहे. चॅटजीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी भारतीयांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर 

9. 11th June in History: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म, सानेगुरुजी यांचं निधन; आज इतिहासात...

11th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. आजच्या दिवशी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला होता, सानेगुरुजी यांचे निधन झालं होतं. चला तर मग जाणून घेऊयात 11 जूनचे इतरही दिनविशेष. वाचा सविस्तर 

10. Horoscope Today 11 June 2023 : मेष, मिथुन, तूळ सह 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 11 June 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीचे लोक कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवतील. तर, कुंभ राशीच्या लोकांना खूप उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. आजचा रविवार मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget