एक्स्प्लोर

Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज

Opposition Unity latest News: भाजपच्या विरोधात देशभरात विरोधकांकडून जवळपास 450 जागांवर एकच उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे.

Opposition Unity:  2024 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे होणाऱ्या बैठकीत फक्त त्या पक्षांना बोलावण्यात आले आहे, जे आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवतील. विरोधी पक्षांच्या एकजुटीला निवडणूकपूर्व आघाडी म्हटले जात आहे. 

तीन राष्ट्रीय पक्ष, 12 प्रादेशिक पातळीवरील पक्ष आणि 4 छोटे पक्ष विरोधी पक्षांच्या एकजुटीत सहभागी होणार आहेत. विरोधी आघाडीत समन्वय समिती स्थापन होऊ शकते. या समितीकडे किमान समान कार्यक्रम आणि जागावाटपाचा वाद सोडविण्याची जबाबदारी असेल. 

'एबीपी'शी बोलताना जेडीयूचे नेते केसी त्यागी म्हणाले की, देशातील 450 लोकसभा जागांवर विरोधी पक्षाकडून उमेदवार उभे करण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे.  अशा स्थितीत विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत अनेक प्रकारचे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. 

विरोधकांच्या आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला काय? कोणत्या जागांवर उमेदवार कोण आणि राज्यनिहाय युतीची रचना काय असेल याबाबत अनेक आडाखे बांधण्यात येत आहेत. 

काँग्रेस, आप आणि सीपीएम (तीनही राष्ट्रवादी पक्ष), सपा, टीएमसी, शिवसेना (ठाकरे), एनसीपी, जेएमएम, सीपीआय, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, एमडीएमके (सर्व राज्यस्तरीय पक्ष) पाटणा पक्षात सामील होणार आहेत.

याशिवाय केरळ काँग्रेस (मणी), आरएसपी, व्हीसीके या छोट्या पक्षांनाही आघाडीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक होऊ शकते. मात्र, अद्याप जागा निश्चित झालेली नाही. महाआघाडीत सहभागी असणारे पक्ष त्याच दिवशी आघाडीच्या अध्यक्षांचे आणि निमंत्रकांचे नाव निश्चित करतील, असे सूत्रांनी सांगितले. 

कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

1. उत्तर प्रदेश- विरोधी ऐक्यात 4 पक्ष एकत्र येऊ शकतात. यामध्ये सपा, काँग्रेस, आरएलडी आणि आझाद समाज पक्षाच्या नावांचा समावेश आहे. सपा, काँग्रेस आणि एएसपी यांची आधीच युती आहे. काँग्रेस लोकसभेत या आघाडीसोबत जाऊ शकते.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. 2019 मध्ये आरएलडी, सपा आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. सपा आघाडीने 15 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएला 64 आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

काँग्रेसकडून राज्यात अधिक जागांवर दावा करण्यात आला. पण, सपा त्याबाबत उत्सुक नाही. आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार उत्तर प्रदेशात काँग्रेसला 7-12 जागा मिळू शकतात. यामध्ये रायबरेली, अमेठी, कुशीनगर, फतेहपूर सिक्री, कानपूर, बिजनौर आणि सीतापूर या जागांचा समावेश आहे. मात्र, काँग्रेसची मागणी जास्त आहे. 2009 च्या निकालाच्या आधारे काँग्रेस 20-25 जागांवर दावा करत आहे.

आरएलडीला 3-5 जागा मिळण्याची शक्यता आहे. जयंत चौधरी यांच्या पक्षाला मथुरा, बागपत, मुझफ्फरनगर आणि बुलंदशहर या जागा मिळू शकतात. चंद्रशेखर आझाद सहारनपूरमधून निवडणूक लढवू शकतात.

उर्वरित जागांवर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष निवडणूक लढवणार आहे. मायावती जर महाआघाडीत सामील होण्यास राजी झाल्या तर त्यांनाही युतीमध्ये स्थान दिले जाईल, असे वृत्त आहे. 

2. महाराष्ट्र- येथे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 16-16-16 जागांचा फॉर्म्युला लागू करण्याची काँग्रेसची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी 18 जागांवर दावा केला आहे.

2019 मध्ये उद्धव यांच्या पक्षाला 18 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही उद्धव यांच्या या दाव्याला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत शिवसेनेला 18 तर राष्ट्रवादी-काँग्रेसला 15-15 जागा मिळू शकतात, असे मानले जात आहे.

महाराष्ट्रात अशा जवळपास 10 जागा आहेत जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभा दावा आहे.  पुणे आणि मुंबई विभागात जास्त जागा आहेत. काँग्रेसलाही दक्षिण मुंबईवर आपला दावा कायम ठेवायचा आहे. 

3. पश्चिम बंगाल- बंगालमधील जागावाटपाची धुरा तृणमूल काँग्रेस या मोठ्या पक्षाच्या हातात असेल. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. 2014 मध्ये तृणमूलला 34, काँग्रेसला 4 आणि सीपीएमला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळीही हे तीन पक्ष महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये, तृणमूल कॉंग्रेसच्या जागा 22 आणि कॉंग्रेसच्या 2 पर्यंत कमी झाल्या. 2019 मध्ये सीपीएमला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, पक्षाची मते 6 टक्क्यांच्या आसपास राहिली. बंगालमध्ये तृणमूल 32, काँग्रेस 6 आणि सीपीएम 4 जागा लढवू शकते.

मुर्शिदाबाद, ब्रह्मपूर, मालदा उत्तर, मालदा दक्षिण, पुरुलिया आणि रायगंज या जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. सीपीएमला उत्तर बंगालमधून 2 आणि मेदिनीपूर-जंगलमहालमधून 1-1 जागा मिळू शकते.

4. बिहार- बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत आणि विरोधी आघाडीतील पक्षांची संख्या 7 आहे. जेडीयूचे सध्या 17 लोकसभेचे खासदार आहेत, तर 2019 मध्ये काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. बिहारमध्ये जागावाटपाच्या सूत्रात विजयी उमेदवाराला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. असे झाल्यास JDU-RJD 16-16, काँग्रेस 6-8 आणि अन्य 0-2 जागांवर उमेदवार उभे करू शकतात. काँग्रेसने किशनगंज, कटिहार, सासाराम, पश्चिम चंपारण, सुपौल, बेगुसराय आणि समस्तीपूर या जागांवर दावा केला आहे. कटिहार आणि सुपौल अजूनही जेडीयूसोबत आहेत. त्याचप्रमाणे जेडीयूच्या मधेपुरा आणि इतर जागांवरही आरजेडीचा डोळा आहे.

5. तामिळनाडू - येथे लोकसभेच्या 39 जागा आहेत आणि गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही द्रमुक आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डीएमके गेल्यावेळेप्रमाणे 28 जागांवर निवडणूक लढवू शकते, तर काँग्रेसला 10 आणि मुस्लिम लीगला एक जागा मिळू शकते. तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या मदतीने काँग्रेसला 9 जागा जिंकता आल्या. 2019 मध्ये, काँग्रेसची सर्वात यशस्वी आघाडी फक्त तामिळनाडूमध्ये होती.

6. हरियाणा- हरियाणामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत आणि काँग्रेस येथे INLD सोबत युती करून निवडणूक लढवू शकते. INLD प्रमुख ओम प्रकाश चौटाला हे नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. आयएनएलडीच्या रॅलीत नितीशसह अनेक विरोधी नेते पहिल्यांदाच जमले होते. हरियाणात आयएनएलडी-काँग्रेसची युती झाली तर काँग्रेस 8 जागा आणि आयएनएलडी 2 जागांवर निवडणूक लढवू शकते. महाआघाडीअंतर्गत INLD ला हिसार आणि जिंदच्या जागा दिल्या जाऊ शकतात.

तीन राज्यात चित्र स्पष्ट नाही?

आतापर्यंत केरळ, पंजाब आणि दिल्लीमध्ये जागावाटपावर पेच अडकला आहे. या राज्यात काँग्रेसची दयनीय स्थिती आहे. पंजाब आणि दिल्लीत 'आप'सोबत युती करण्यास काँग्रेस तयार नाही, मात्र नितीशकुमार यांनी अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले आहे. तर, केरळमध्ये डावी आघाडी  आणि काँग्रेसची युडीएफ यांच्यात थेट मुकाबला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या युडीएफला 17 जागा मिळाल्यात. 

7 राज्यांमध्ये केवळ 157 जागांवर काँग्रेसचे उमेदवार

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिशामध्ये काँग्रेस 157 जागांवर एकट्याने लढणार आहे. या ठिकाणी काँग्रेसला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा असेल. 2019 मध्ये या 157 पैकी काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या होत्या. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 120 जागांवर भाजपशी थेट लढत आहे. ओडिशा आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची लढत प्रादेशिक पक्षांशी आहे. दोन्ही ठिकाणी भाजपही मजबूत स्थितीत आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसची भाजप आणि जेडीएससोबत लढत आहे. 2024 च्या निवडणुकीत जेडीएस भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आसामचा निर्णय अजून घेण्यात आला नाही. येथील युतीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेस हायकमांडवर टाकली जाऊ शकते, असे  म्हटले जात आहे. आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना दिली जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Embed widget