एक्स्प्लोर

Biparjoy Cyclone : बिपरजॉयचं संकट! येत्या 12 तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार, महाराष्ट्रासह 'या' राज्यांना धोका

Biporjoy Cyclone : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस गुजरातमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील काही भागांतही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : बिपरजॉय चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) येत्या काही तासांत अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टी भागातही याचा परिणाम दिसून येणार आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 'बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर 11 जून 2023 रोजी मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 जून रोजी दुपारच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान आणि लगतच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.'

महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही

भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 12 तासांत बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता नाही. पण या भागात वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीपासून 200 ते 300 किलोमीटर अंतरावरून पुढे सरकणार असल्याची शक्यता आहे. 

चक्रीवादळ पुढील 12 तासांत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता

सध्या हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळ पाकिस्तानमध्ये आदळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुजरातमध्ये जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. IMD ने म्हटलं आहे की, 'बिपरजॉय' चक्रीवादळ पुढील 12 तासांत अत्यंत रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. देशात चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ पुढील 24 तासांत उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. देशात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसह गोव्यामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतासह 'या' देशांवर चक्रीवादळाचा परिणाम होणार

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या इतर देशांचा समावेश आहे. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळाचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो. येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Weather : विदर्भासह कोकणात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती, 16 जूनला मान्सून कोकणात प्रवेश करण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
Delhi Assembly Election Result : केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Assembly Election Result : दिल्लीत काँग्रेसला पुन्हा नाकारलं? कारणं काय?Delhi Election Result 2025 : दिल्लीमध्ये सत्तांतर, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमतDelhi Election Result 2025 : दिल्लीत भाजपची मुसंडी, सुरुवातीच्या कलांमध्ये ओलांडला बहुमताचा आकडाDelhi Assembly Election Result : पोस्टल बॅलेटच्या पहिल्या कलांत भाजप आघाडीवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Suryakumar Yadav Ranji Trophy : रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
रोहितनंतर सूर्याच्या बॅटलाही ग्रहण; नॉकआऊट सामन्यात मुंबईची अवस्था बिकट, रणजीत मोठा उलटफेर
Delhi Assembly Election Result : केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
केजरीवाल पिछाडीवर, काँग्रेसला पुन्हा नाकारलं, दिल्ली नेमकी कुणाची? आज निकाल
VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर', नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर', नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
Delhi Election Results 2025: मायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला!
मायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला!
Delhi Election Result 2025 : आपापसात आणखी लढा, एकमेकांना संपवा, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा 'आप' अन् काँग्रेसवर हल्लाबोल
आपापसात आणखी लढा, एकमेकांना संपवा, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा 'आप' अन् काँग्रेसवर हल्लाबोल
Delhi Election Result 2025 : दिल्लीत मतमोजणी सुरु असताना मोठा ट्विस्ट, बसपाच्या उमेदवाराने अचानक 'आप'ला पाठिंबा दिला, नेमकं काय घडलं?
दिल्लीत मतमोजणी सुरु असताना मोठा ट्विस्ट, बसपाच्या उमेदवाराने अचानक 'आप'ला पाठिंबा दिला, नेमकं काय घडलं?
Embed widget