"पुस्तकातून आमची नावं काढून टाका..."; योगेंद्र यादव अन् सुहास पळशीकर यांची मागणी, NCERT म्हणतंय, ते शक्य नाही, प्रकरण नेमकं काय?
योगेंद्र यादव आणि दुसरे शिक्षणतज्ज्ञ सुहास पळशीकर यांचा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (NCERT) मुख्य सल्लागार म्हणून उल्लेख केला आहे. अशातच योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर या दोघांनीही त्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकावा अशी मागणी केली आहे.
![ncert textbook modification issue suhas palshikar and yogendra yadav request for name removal](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/145e5b76ddaafa4ba2ef99ffa6eaa07e1673198528420636_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NCERT Textbook Modification Issue: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (NCRT) पाठ्यपुस्तकांमध्ये झालेल्या बदलांमुळे सुहास पळशीकर (Suhas Palshikar) आणि योगेंद्र यादव (Yogendra Yadav) दोघेही नाराज आहेत. दोघांनी NCERT ला पत्र लिहून पुस्तकांमध्ये 'एकतर्फी आणि अतार्किक' काटछाट केल्याचा आरोप केला आहे. मुख्य सल्लागार म्हणून त्यांचं नाव राज्यशास्त्राच्या पुस्तकातून वगळण्यात यावं, असंही दोघांनी या पत्रात म्हटलं आहे. तर एनसीईआरटीचं याबाबत म्हणणं आहे की, एखाद्याची संलग्नता काढून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तके दिलेल्या विषयावरील ज्ञान आणि आकलनाच्या आधारे विकसित केली जातात आणि कोणत्याही स्तरावर वैयक्तिक लेखकत्वाचा दावा केला जात नाही. दरम्यान, सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव हे इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्राच्या मुख्य पुस्तकांसाठी मुख्य सल्लागार आहेत.
स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव (Yogendra Yadav News) यांनी एनसीईआरटीच्या (NCERT) राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून त्यांचं नाव काढून टाकण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. तसेच त्यांनी देशाच्या सर्वोच्च शैक्षणिक संशोधन संस्थेनं त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. दरम्यान, योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर हे इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्राच्या मूलभूत पुस्तकांसाठी मुख्य सल्लागार आहेत.
योगेंद्र यादव आणि दुसरे शिक्षणतज्ज्ञ सुहास पळशीकर यांचा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (NCERT) मुख्य सल्लागार म्हणून उल्लेख केला आहे. अशातच योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर या दोघांनीही त्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकांमधून काढून टाकावा अशी मागणी केली आहे.
योगेंद्र यादव यांचं ट्वीट
योगेंद्र यादव यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "एनसीईआरटीनं प्राध्यापक सुहास पळशीकर आणि माझ्या पत्राला अनौपचारिक निवेदनाद्वारे उत्तर दिलं आहे हे पाहून वाईट वाटलं. त्याहूनही निराशाजनक बाब म्हणजे, त्यांचं निवेदन आम्ही उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्याला स्पष्टीकरण देत नाही."
एनसीईआरटीनं यादव यांच्या पहिल्या पत्राला उत्तर देताना त्यांचं नाव काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकं "एखादा देण्यात आलेल्या विषयावर आमचं ज्ञान आणि दिलेल्या विषयाची समज यावर विकसित केली जातात. त्यामुळे कोणत्याही स्तरावर याबाबत वैयक्तिक मालकी नसते." NCERT नं आपल्या उत्तरात फीडबॅत, तथ्यात्मक चुकीची ओळख आणि इतर घटकांच्या आधारे वेळोवेळी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याच्या अधिकाराचे रक्षण केलं असल्याचंही सांगितलं.
दरम्यान, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCRT) नं नवीन शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात 'महात्मा गांधींच्या मृत्यूचा देशातील जातीय परिस्थितीवर परिणाम', 'गांधींच्या हिंदू मुस्लिम एकतेच्या संकल्पनेनं हिंदू कट्टरवाद्यांना चिथावणी दिली' आणि 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सारख्या संघटनांवरील तात्पुरती बंदी' यांसारखा मजकूर पाठ्यपुस्तकांमधून काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आला होता.
याव्यतिरिक्त अकरावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातून गुजरात दंगलीचा काही भाग काढून टाकण्यात आला आहे. एनसीईआरटीनं मात्र असं म्हटलं होतं की, अभ्यासक्रमाचे तर्कशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी करण्यात आला होता आणि या वर्षी जे काही झालं ते काहीही नवीन नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- NCERT च्या पुस्तकावरून पुन्हा वादाची ठिणगी; लोकशाही आणि विविधतेवरील धडा, विज्ञानातून 'आवर्तन सारणी' वगळली
- NCERT Books: हिंदू-मुस्लिम एकता, संघावर बंदीचा भाग एनसीईआरटीच्या पुस्तकातून वगळला; जाणून घ्या नेमकं काय बदललं?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)