Morning Headlines 3rd May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Karnataka Assembly Election 2023: बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या अन् डीके शिवकुमार... मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नंबर 1 कोण? सर्वेक्षणातून मोठा निष्कर्ष
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) जवळपास एक आठवडा शिल्लक आहे. निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ताज्या निवडणूक सर्वेक्षणाच्या आकडेवारीत, कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंतीचा चेहरा कोण? यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी विराजमान कोण होणार? तसेच, या शर्यतीत कोण आहे? यासंदर्भातही सर्वेक्षणातून जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. हे सर्वेक्षण CSDS ने NDTV साठी केलं आहे. वाचा सविस्तर
CBI Seizes: घरातील पलंगामध्ये रोख रक्कम, सुटकेसमध्येही सापडले पैसे; WAPCOS च्या माजी CMDच्या मालमत्तांवर CBI चे छापे, 20 कोटी जप्त
CBI Seizes: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयनं (CBI) मंगळवारी (2 मे) मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वॉटर अँड पॉवर कंसल्टंसी (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता (Rajender Kumar Gupta) यांच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केली. छापे टाकून सीबीआयनं तब्बल 20 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. वाचा सविस्तर
...म्हणून गो फर्स्टची उड्डाणं रद्द, प्रवाशांची तक्रार, DGCA नं बजावली कारणे दाखवा नोटीस
Go First Fliers Fumes: गो फर्स्ट (GO First) एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. कंपनीकडून तीन आणि चार मे रोजीची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कंपनीला इंजिनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे उड्डाणं रद्द करत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. कंपनीनं दिवाळखोरी घोषित करण्यासाठी NCLT कडे अर्ज केला असल्याचीही माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर
Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या; 'या' याप्रकरणी न्यायालयानं दिलेत चौकशीचे आदेश
Savarkar Remarks Row: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow Court) येथील न्यायालयानं मंगळवारी (2 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. वाचा सविस्तर
National Politics: पंजाबमध्ये सरकारी कार्यालयांच्या वेळापत्रकात बदल, 2 मेपासून सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार ऑफिस
देशात तापमानाचा पारा (Mumbai Temperature) वाढलेला आहे. अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे आवश्यक असेल तर घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि चंदीगढ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने वाढत्या उन्हामुळे सरकारी कार्यालयाच्या कामकजांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. आता सरकारी कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत. विजेची बचत करण्यासाठी हा मान सरकारने हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर
3rd May In History: पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित, हमीद दलवाई यांचे निधन; आज इतिहासात
3rd May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आज 3 मे रोजी देखील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला. तर, आज चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची जयंती आहे. मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई, अभिनेत्री नर्गिस, गीतकार जगदीश खेबुडकर यांचा स्मृतीदिनदेखील आहे. वाचा सविस्तर
Horoscope Today 3 May 2023 : मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष राशीच्या लोकांना प्रवासात एखादी सुंदर अनोळखी व्यक्ती भेटल्याने चांगले अनुभव मिळू शकतात. तर, सिंह राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा राहील? काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर