एक्स्प्लोर

CBI Seizes: घरातील पलंगामध्ये रोख रक्कम, सुटकेसमध्येही सापडले पैसे; WAPCOS च्या माजी CMDच्या मालमत्तांवर CBI चे छापे, 20 कोटी जप्त

CBI Seizes: सीबीआयनं मंगळवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी WAPCOS वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सीचे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता यांच्यावर मोठी कारवाई केली.

CBI Seizes: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयनं (CBI) मंगळवारी (2 मे) मोठी कारवाई केली. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वॉटर अँड पॉवर कंसल्टंसी (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता (Rajender Kumar Gupta)  यांच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केली. छापे टाकून सीबीआयनं तब्बल 20 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. 

जलशक्ती मंत्रालयाच्या (Ministry of Water Power) माजी सीएमडीच्या घरावर सीबीआयनं छापा टाकला. दिल्ली (Delhi) आणि चंदीगडसह (Chandigarh) देशभरातील त्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. छापेमारीत 20 कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. अशा प्रकारे या छाप्यात एकूण 20 कोटी रुपयांची रोकड आणि अनेक प्रकारची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी (WAPCOS) मध्ये सीएमडी म्हणून काम करत होते. हा विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होता.

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम (Gurugram), सोनीपत (Sonipat)  आणि गाझियाबादसह (Ghaziabad) सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, 20 कोटी रुपयांच्या रोखी व्यतिरिक्त, आम्ही मालमत्तेशी संबंधित कागदपत्रं आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत.

सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड घरातच सापडली. सीबीआयनं यासंदर्भात बोलताना सांगितलं की, पुढील तपास सुरू असून हा पैसा कुठून आला याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे सर्व समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. 

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रं, दागिने आणि डिजिटल उपकरणं असे सुमारे 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या तपास सुरू आहे. WAPCOS च्या माजी CMD विरुद्धचा आरोप असा आहे की, त्यांच्याकडे 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2019 या कालावधीत त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता होती. 

दरम्यान, वाप्कोस (WAPCOS) हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सरकारच्या मालकीतील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे पूर्वी 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (WAPCOS Water & Power Consultancy India) म्हणून ओळखलं जात असे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget