एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 7th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर देण्याचे मोदींचे निर्देश; इंडिया आघाडीच्या अडचणी वाढणार?

PM Modi On Sanatan Remarks: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) बुधवारी (6 सप्टेंबर 2023) जी20 संदर्भात झालेल्या बैठकीत उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढू शकतात. याशिवाय या बैठकीत मोदींनी सरकार आणि पक्ष कार्यकर्त्यांना इंडिया विरुद्ध भारत लढतीपासून दूर राहण्यास सांगितलं आहे. वाचा सविस्तर 

स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा विपर्यास केलाय, द्रमुककडून भाजप नेत्याची तक्रार; तामिळनाडू पोलिसांकडून FIR दाखल

Udhayanidhi Stalin Sanatana Dharma Row: डीएमके (DMK) पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या वक्तव्या प्रकरणी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. डीएमकेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, अमित मालवीय (Amit Malviya) यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे म्हटलं होतं त्याचा विपर्यास करून सोशल माध्यमांवर पोस्ट केलं आहे. या तक्रारीवरून तामिळनाडूच्या त्रिची पोलिसांनी बुधवारी (6 सप्टेंबर) अमित मालवीय यांच्याविरुद्ध कलम 153 अ, 504, 505 1 (बी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. यावरुन देशभरात चर्चांना उधाण आलं होतं. वाचा सविस्तर 

Google चे सीईओ सुंदर पिचाईंनी दिला आठवणींना उजाळा; सांगितला वडिलांसोबतच्या पहिल्या ईमेलचा किस्सा

Google CEO : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी नुकताच लिहिलेला एक ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आपल्या या ब्लॉगमध्ये पिचाई यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से शेअर केले आहेत. ब्लॉगमध्ये सुंदर पिचाई यांनी त्यांच्या वडिलांबाबतचा एक 25 वर्षांपूर्वीचा किस्सा शेअर केला आहे.  पिचाई यांनी सांगितलेला किस्सा ऐकून भावूक व्हायला होतंय. सध्या हा किस्सा सर्वांमध्येच चर्चेचा विषय ठरत आहे. वाचा सविस्तर 

Uttar Pradesh: भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू, वडिलांच्या मिठीतच सोडले प्राण

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील (Ghaziabad) 14 वर्षांच्या मुलाचा रेबिजमुळे दुर्दैवी मृत्यू (Rabies Death) झाला. दीड महिन्यांपूर्वी मुलाला शेजाऱ्याचा कुत्रा चावला (Dog bite) होता. आई-वडिलांच्या भीतीमुळे मुलाने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि स्वत:च जखमेवर हळद लावली. जवळपास महिना उलटल्यानंतर, म्हणजेच 1 सप्टेंबरपासून मुलगा विचित्र वागू लागला आणि त्यावेळी त्याने घरच्यांना कुत्रा (Dog) चावल्याबद्दल सांगितलं. हे कळताच कुटुंबीय त्याला रुग्णालयात घेऊन गेले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला रेबिज झाल्याचं सांगितलं. विविध रुग्णालय फिरुनही कोणी मुलाला दाखल करुन घेण्यास तयार नव्हतं. अखेर 4 सप्टेंबरला मुलानं तडफडून वडिलांच्या कुशीत जीव सोडला. वाचा सविस्तर 

Janmashtami 2023 : हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की...देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

Janmashtami 2023 : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा (Janmashtami 2023) उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दरम्यान, मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि हाच उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा (Shri Krishna) जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. जन्माष्टमीच्या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा केली जाते. भाविक भजन आणि कीर्तन गात या दिवशी उपवास करतात, तसेच भव्य सजावटही करतात. वाचा सविस्तर 

Water Crisis : पृथ्वीवर पिण्याचं पाणी मर्यादित, साठा संपल्यास मोठं संकट; मग मानवाचं काय होईल?

मुंबई : पाणी (Water) हेच जीवन आहे. पाण्यावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून आहे. पाण्याचे नवनवीन साठे शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मानव अगदी अंतराळात पोहोचला आहे. इतर ग्रहांवर पाणी उपलब्ध आहे की नाही हे शोधण्यासाठी जगभरातील देश कोट्यवधी रुपये खर्च करुन इतर ग्रहांबाबत संशोधन करत आहेत. भारतही चांद्रयान-3 द्वारे चंद्रावरील पाण्याचे साठे शोधण्याच्या प्रयत्नात आहे. वाचा सविस्तर 

7th September In History : इस्रोचा चांद्रयान-2 शी संपर्क तुटला, नीरजा भानोतचा जन्म; आज इतिहासात

7th September In History : भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर 23 ऑगस्ट 2023 रोजी सुरक्षितपणे उतरलं. ही मोहिम चांद्रयान-2 (Chandrayaan-2) चा पुढचा टप्पा होता. कारण, चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी झाली होती. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधीच चांद्रयान-2 चा इस्रोशी संपर्क तुटला होता. 2018 मध्ये आजच्याच दिवशी इस्रोने चांद्रयान-2 शी संपर्क तुटल्याचं जाहीर केलं होतं. पण, त्यानंतरही भारताने हार न मानता चार वर्ष कठोर परिश्रम घेतले आणि भारत अखेर चंद्रावर पोहोचला. आज नीरजा भानोत हिचा जन्मदिन आहे.  प्रवाशांची सुटका करताना जीव गमावणारी फ्लाइट अटेंडंट नीरजा भानोत हिला मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं. यासोबतच आज अभिनेत्री राधिका आपटे हिचाही वाढदिवस आहे. आज 7 सप्टेंबर रोजी देशात आणि जगातच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वाचा सविस्तर 

Horoscope Today 7 September 2023 : मेष, मिथुन, तूळसह या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 7 September 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज खूप अस्वस्थ होऊ शकतात. आज कोणाशीही पैशांचा व्यवहार करू नका. तर, वृषभ राशीच्या लोकांना कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. आज तुमचे मन समाधानी राहील. एकूच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थितNahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?Nagraj Manjule Summons : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना गंभीर प्रकरणात पुणे कोर्टाकडून समन्स; नेमकं प्रकरण काय?ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांना फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Embed widget