Dhule News : धक्कादायक... घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं, कुटुंबियांनी फोडला टाहो, धुळ्यातील दुर्दैवी घटना
Dhule News : धुळ्यातील सुभाष नगर परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलंय.
धुळे : येथील सुभाष नगर (Subhash Nagar) परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) घंटागाडीने दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी या घटनेबाबत रोष व्यक्त केलाय.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने एका दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वाहन चालकाला अटक
दरम्यान, जूने धुळे परिसरातील नागरिक आणि चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तत्काळ वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या