(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर देण्याचे मोदींचे निर्देश; इंडिया आघाडीच्या अडचणी वाढणार?
PM Modi: उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माला नष्ट करण्याच्या वक्तव्यावर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे, तर स्टॅलिन यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागण्यास नकार दिला आहे.
PM Modi On Sanatan Remarks: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) बुधवारी (6 सप्टेंबर 2023) जी20 संदर्भात झालेल्या बैठकीत उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढू शकतात. याशिवाय या बैठकीत मोदींनी सरकार आणि पक्ष कार्यकर्त्यांना इंडिया विरुद्ध भारत लढतीपासून दूर राहण्यास सांगितलं आहे.
पीएम मोदी बैठकीत बोलताना म्हणाले की, ज्या कार्यकर्त्यांकडे याचा प्रतिकार करण्यासाठी पुरेसं तर्कशास्त्र नाही, त्यांनी इंडिया विरुद्ध भारत या वादात उडी घेऊ नये. ते पुढे बोलताना म्हणाले की, या वादावर त्यांनीच वक्तव्य करावं, ज्यांना या विषयाबाबत माहिती आहे आणि त्यासंदर्भात त्यांच्या अभ्यास आहे. आगामी काळात केंद्र सरकार इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरणार असल्याचे संकेतही पंतप्रधान मोदींनी या बैठकीत दिल्याचं बोललं जात आहे.
मोदींचं वक्तव्य इंडिया आघाडीसाठी अडचणीचं?
उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माबाबत एक वक्तव्य केलं आणि संपूर्ण देशभरात वादविवाद सुरू झाला आहे. हे वक्तव्य देशातील तीन राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी करण्यात आल्यामुळे या वक्तव्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. हे वक्तव्य भाजपसाठी वरदानापेक्षा कमी नाही, कारण या तिनही राज्यांतील बहुसंख्य जनता सनातन धर्माची अनुयायी आहे. या राज्यांमध्ये मुख्यतः भाजपची काँग्रेसशी स्पर्धा आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या इंडिया आघाडीतील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच, उदयनिधी स्टॅलिन यांचा पक्ष द्रमुकही इंडिया आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे स्टॅलिन यांच्या वक्तव्यामुळे भाजपकडे द्रमुकवर निशाणा साधून काँग्रेसवर वार करण्याची आयती संधी चालून आल्याचं बोलंलं जात आहे.
काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?
उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे.
उदयनिधी स्टॅलिन वक्तव्यावर ठाम
उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :