Morning Headlines 7th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Mahadev App Case: महादेव अॅप प्रकरणी बॉलिवूड रडारवर, कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर ईडीचा छापा, मुंबईत 5 ठिकाणी छापेमारी
Bollywood Connection in Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप (Mahadev App Case) प्रकरणी ईडीची कारवाई (Action by ED) सुरूच आहे. अंमलबजावणी संचालनालयानं याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. महादेव बुक प्रकरणी ईडीनं एका बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा (Qureshi Productions Raids) टाकला आहे. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महादेव बुक अॅप प्रकरणी ईडीनं शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनसह आसपासच्या इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. वाचा सविस्तर
Sikkim Floods : सिक्कीममध्ये पुराचा तडाखा! 25000 लोक बाधित, 1200 घरे वाहून गेली, आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू
Sikkim Flood Update : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1200 घरे वाहून गेली. तर 15 लष्करी जवानांसह 103 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 25 हजार लोक बाधित झाले आहेत. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगारा आणि चिखलात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव पथके कार्यरत आहेत. वाचा सविस्तर
Weather Update : पुढील 24 तास परतीच्या पावसाचा धुमाकूळ, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Weather Forecast : देशात आज आणि उद्या पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळणार आहे. देशात (India Weather Update) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. देशासह राज्यातूनही (Maharashtra Monsoon Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हवामाना विभागाच्या अंदाजानुसार, देशात रविवारपर्यंत देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातही विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मात्र, तापमान वाढलं असून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार आहे. वाचा सविस्तर
एखाद्या डब्ब्यात किंवा पाकिटात... 2 हजाराची नोट कुठे चुकून राहिलीय का पाहा अन् आजच बँकेतून बदलून घ्या!
2000 Rupees Notes: आर्थिकदृष्ट्या ऑक्टोबर महिना अत्यंत महत्त्वाच्या आहे. सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, 2000 रुपयांची नोट (2000 Rupee Note) बंद होणार आहेत. सरकारनं नोटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली होती. त्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस. तुमच्याकडे अजुनही 2 हजारांच्या नोटा असल्यास त्या बँकेत (Bank) जमा करण्याची आज शेवटची संधी आहे. जर तुम्ही आज 2 हजारची नोटी बदलून घेतली नाही, तर मात्र त्यानंतर तुम्हाला नोटा बदलता येणार नाहीत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत परत करण्याची सुविधा सर्वांना दिली होती. त्यानंतर, केंद्र सरकारकडूनच ही मुदत वाढवण्यात आली. वाचा सविस्तर
Asian Games 2023 : मराठमोळ्या ओजसचा सुवर्णभेद, भारतासाठी जिंकलं तिसरं 'गोल्ड'; अभिषेकला रौप्यपदक
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट कायम आहे. नागपूरच्या मराठमोळ्या ओजस देवतळे (Ojas Deotale) ने भारताला तिरंदाजीत (Archery) आणखी एक सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून दिलं आहे. तर अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये पुरुषांच्या एकल तिरंदाजी स्पर्धेत (Archery Men's Compound Individual) भारतीय तिरंदाजांनी भारताला आणखी दोन पदकं मिळवून दिली आहेत. महत्वाचं म्हणजे पुरुष एकेरी तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्येच लढत होती. ओजस देवतळे आणि अभिषेक वर्मा या दोन्ही भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज पार पडलेल्या अंतिम फेरीत ओजस देवतळेने सुवर्णभेद केला आहे. वाचा सविस्तर
Mexico Accident: मेक्सिकोमध्ये भीषण रस्ता अपघात, स्थलांतरितांनी भरलेली बस उलटली, 18 ठार, 29 जखमी
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये (Mexico) शुक्रवारी (6 ऑक्टोबर) व्हेनेझुएला (Venezuela) आणि हैतीमधून प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात दोन महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात (Accident News) झाला. वाचा सविस्तर
7th october In History : शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे निधन, भारतात रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना आणि अमेरिकेचा अफगाणिस्तानवर हल्ला; आज इतिहासात
7th october In History : देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी, दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आजच्याच दिवशी, 7 ऑक्टोबर रोजी शिघ्र कृती दल म्हणजेच रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना केली. तसेच मदर टेरेसा यांच्या मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. यासह आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे... वाचा सविस्तर
Horoscope Today 7 October 2023 : तूळ, मकर राशीच्या लोकांना मिळणार आज लाभ! आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 7 October 2023 : आज, शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी शनी महाराज त्यांच्या मूळ राशीत कुंभ राशीत भ्रमण करत आहेत, यामुळे तूळ आणि मकर राशीच्या लोकांना आज षष्ठ योगाचा लाभ मिळेल. यासोबतच आज चंद्रही मिथुन राशीतून कर्क राशीत जाणार असून त्यामुळे शशी योग तयार होईल. आजचे राशीभविष्य जाणून घ्या, आज तुमच्यासाठी या ग्रह-नक्षत्रांची स्थिती कशी असेल? (Rashibhavishya In Marathi) वाचा सविस्तर