Mexico Accident: मेक्सिकोमध्ये भीषण रस्ता अपघात, स्थलांतरितांनी भरलेली बस उलटली, 18 ठार, 29 जखमी
Mexico: यूएस-मेक्सिको सीमेवर जाण्याच्या प्रयत्नात विविध देशांतील हजारो स्थलांतरित बस, ट्रेलर आणि मालगाड्यांमधून प्रवास करतात. यापूर्वीही अशाच अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत.
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये (Mexico) शुक्रवारी (6 ऑक्टोबर) व्हेनेझुएला (Venezuela) आणि हैतीमधून प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात दोन महिला आणि तीन लहान मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात (Accident News) झाला.
या बस अपघात मेक्सिकोच्या शेजारील राज्य प्यूब्लाच्या सीमेजवळ असलेल्या टेपेलामेम शहरात घडला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बस अपघातात एकूण 29 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय इमीग्रेशन एजन्सीनं सांगितलं की, बसमध्ये 55 परदेशी नागरिक होते. तसेच, अपघातग्रस्तांमध्ये 55 विदेशी नागरिकांचाही समावेश करण्यात आहे.
बस, ट्रेलर आणि मालगाड्यांमधून स्थलांतरितांचा प्रवास
अमेरिकेत जाणाऱ्या प्रवाशांचा नवा अपघात आहे. यूएस-मेक्सिको सीमेवर जाण्याच्या प्रयत्नात विविध देशांतील हजारो प्रवासी बस, ट्रेलर आणि मालगाड्यांमधून प्रवास करतात. गेल्या रविवारी, क्यूबामधून प्रवाशांना घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चियापासमध्ये उलटला, त्यात किमान 10 क्यूबन प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 25 जखमी झाले आहेत. मेक्सिकन नॅशनल इमिग्रेशन इन्स्टिट्यूटनं सांगितलं की, अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये क्युबा येथील महिलांचा समावेश होता. त्यापैकी एक 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या एका तरुणीचाही समावेश होता.
मेक्सिकन सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिको सोडणाऱ्या स्थलांतर करणाऱ्यांती संख्या मोठी आहे. ज्यापैकी बहुसंख्य मध्य अमेरिका, व्हेनेझुएला, क्युबा आणि हैती येथील आहेत.
189,000 हून अधिक स्थलांतरितांना ताब्यात घेतलं
मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी गेल्या महिन्यात 189,000 हून अधिक स्थलांतरितांना ताब्यात घेतलं, तर यूएस बॉर्डरवरील सैन्यानं ऑक्टोबर 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान 1.8 दशलक्ष स्थलांतरितांनी सीमा ओलांडल्याची नोंद केली आहे. यूएस आणि मेक्सिकन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सीमा सुरक्षा आधुनिकीकरण आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या उपायांद्वारे अनियमित स्थलांतराचा सामना करण्यासाठी काम केलं आहे.
मेक्सिकन अधिकारी सामान्यत: योग्य कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना नियमित बससाठी तिकीट खरेदी करण्यापासून रोखतात. त्यामुळे ज्यांच्याकडे तस्कर भाड्यानं घेण्यासाठी पैसे नसतात, ते सहसा नादुरुस्त असलेल्या बसेस भाड्याने घेतात आणि त्यामुळेच बरेच अपघात होतात.