Mahadev App Case: महादेव अॅप प्रकरणी बॉलिवूड रडारवर, कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर ईडीचा छापा, मुंबईत 5 ठिकाणी छापेमारी
Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत. महादेव बुक अॅप प्रकरणी ईडीनं शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनसह आसपासच्या इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.
Bollywood Connection in Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप (Mahadev App Case) प्रकरणी ईडीची कारवाई (Action by ED) सुरूच आहे. अंमलबजावणी संचालनालयानं याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. महादेव बुक प्रकरणी ईडीनं एका बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा (Qureshi Productions Raids) टाकला आहे. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महादेव बुक अॅप प्रकरणी ईडीनं शुक्रवारी कुरेशी प्रॉडक्शनसह आसपासच्या इतर पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी प्रोडक्शनला हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली होती. कुरेशी प्रोडक्शन्स एका टॉप बॉलिवूड स्टारला घेऊन बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून तो इतर अनेक भाषांमध्ये डब करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
अंधेरी आणि इतर काही ठिकाणी छापेमारी अजूनही सुरू आहेत. वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी हे प्रोडक्शन हाऊस चालवतात. वसीम कुरेशीची चौकशी केली सुरू आहे, त्याच्या प्रवासाचे सर्व तपशील तपासले जात आहेत आणि आर्थिक तपशीलांबाबतही ईडीकडून माहिती घेतली जात आहे.
बॉलिवूड ईडीच्या राडारवर
गेल्या वर्षी 18 सप्टेंबर रोजी UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि सक्सेस पार्टीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावं आता समोर आली आहेत. एक युट्युब इन्फ्लुएंसर जो या पार्टीत सहभागी झाला होता, त्यानं आपल्या स्वतःचा युट्युब अकाऊटवरून एक व्हिडीओ साधारणतः एक वर्षापूर्वी प्रसारित केला होता. त्या व्हिडीओचं आता विश्लेषण केलं जाणार आहे आणि अनेक बॉलिवूड कलाकार पार्टीत सहभागी झाल्याचं त्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये जेजे बॉलिवूड स्टार्स दिसत आहेत, ते सर्व आता ईडीच्या राडारावर आहेत. सक्सेस पार्टीचे अनेक व्हिडीओ काही दिवसांत समोर आले आहेत. ज्यामध्ये सौरव चंद्राकार यांच्या लग्नापासून तर बर्थडे पार्टी आणि सक्सेस पार्टीमध्ये अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यांना त्यासाठी पैसेसुद्धा मिळाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सौरभ चंद्राकर मुख्य आरोपीनं आपल्या लग्नासाठी 200 कोटी रुपये तर बर्थडे आणि सक्सेस पार्टीसाठी 60 कोटी रुपये खर्च केल्याचा तपासात समोर येत आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी कोणते बॉलिवूड सेलिब्रिटी रडारवर?
- रफ्तार
- Emcee दीप्ती साधवानी
- सुनील शेट्टी
- सोनू सूद
- संजय दत्त
- हार्डी संधू
- सुनील ग्रोव्हर
- सोनाक्षी सिन्हा
- रश्मिका मानधना
- सारा अली खान
- गुरु रंधावा
- सुखविंदर सिंह
- टायगर श्रॉफ
- कपिल शर्मा
- नुसरत बरुचा
- डीजे चेतस
- मलायका अरोरा
- नोरा फतेही
- अमित त्रिवेदी
- मौनी रॉय
- आफताब शिवदासानी
- सोफी चौधरी
- डेझी शाह
- उर्वशी रौतेला
- नर्गिस फाखरी
- नेहा शर्मा
- इशिता राज
- शमिता शेट्टी
- प्रीती झांगियानी
- स्नेहा उल्लाल
- सोनाली सहगल
- इशिता दत्ता
- एलनाझ
- ज्योर्जिओ अॅड्रियानी
मनी लॉन्ड्रिंगचं मोठं नेटवर्क उघड
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडी सातत्यानं छापेमारी करत आहे. तसेच, याप्रकरणी अनेकांची चौकशीही करण्यात आली आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात 200 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हे लग्न सौरभ चंद्राकरचं होतं. सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. सौरभनं त्याचा मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं. या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. त्याच्याशाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.