एक्स्प्लोर

7th october In History : शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे निधन, भारतात रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना आणि अमेरिकेचा अफगाणिस्तानवर हल्ला; आज इतिहासात 

On This Day In History : देशातील दंगलविरोधी पथक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शीघ्र कृती दलाची (Rapid Action Force) स्थापना 7 ऑक्टोबर 1992 रोजी करण्यात आली. 

7th october In History : देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी, दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आजच्याच दिवशी, 7 ऑक्टोबर रोजी शिघ्र कृती दल म्हणजेच रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना केली. तसेच मदर टेरेसा यांच्या मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली. यासह आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे,  

1586- मुघलांनी काश्मीर जिंकलं

मुघल सैन्याने आजच्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर 1586 रोजी काश्मीरमध्ये प्रवेश केला. चक वंशाचा राजा युसुफ शाह याने मुघलांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे अकबराच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने काश्मीरवर कब्जा मिळवला. 

1708- शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांचे नांदेंडमध्ये निधन ( Sikh Guru Gobind Singh Death) 

शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांचे 7 ऑक्टोबर रोजी नांदेड (Nanded) या ठिकाणी निधन झालं. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षे शत्रूविरुद्ध सामना केला. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरात आपला देह ठेवला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. 

श्री गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना आणि अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले.

1914- ठुमरी आणि गझल गायिका बेगम अख्तर यांचा जन्मदिन 

ठुमरी आणि गझल गायिका बेगम अख्तर (Begum Akhtar) यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1914 रोजी उत्तर प्रदेशातील भदरसा या ठिकाणी झाला. गझल या गायिकेमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना 'मल्लिका ए गझल' असं म्हटलं जायचं. 

1931- आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या डेसमंड टूटू यांचा जन्मदिन 

आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधात लढा उभा करणाऱ्या डेसमंड टूटू (Desmond Tutu) यांचा 7 ऑक्टोबर 1931 रोजी जन्म झाला. डेसमंड टूटू हे एक आंग्ल आर्चबिशप होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा पुकारला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

1950- मदर टेरेसा यांना 'मिशनरी ऑफ चॅरिटी'ची स्थापना करण्यास मंजुरी 

देशातील रंजल्या-गांजल्या लोकांची सेवा करण्यासाठी मदर टेरेसा (Mother Teresa) यांनी आपले जीवन समर्पित केलं. त्यांनी भारतात आपल्या कार्याची सुरुवात केली. मदर टेरेसा यांना 7 ऑक्टोबर 1950 रोजी मिशनरी ऑफ चॅरिटी या (Missionaries of Charity) संस्थेची स्थापना करण्यासाठी मान्यता देण्यात आली. मदर टेरेसा यांनी ही संस्था कोलकात्यात स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरुवात केली. आज त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून देशभरात शेकडो अनाथालयं आणि रुग्णालयं कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. मदर टेरेसा यांच्या या कार्याची दखल घेऊन 1979 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तर 1980 साली त्यांना भारतरत्न देण्यात आला. 

1989- मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा जन्मदिन 

भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि मिस वर्ल्डचा खिताब पटकवणाऱ्या युक्ता मुखी हिचा जन्म 7 ऑक्टोबर 1989 रोजी झाला. मिस वर्ल्ड हा पुरस्कार पटकवणारी युक्ता मुखी ही चौथी भारतीय महिला ठरली होती. 

1992- रॅपिड अॅक्शन फोर्सची स्थापना 

आजच्या दिवशी, 7 ऑक्टोबर 1992 रोजी भारतात शीघ्र कृती दल म्हणजे रॅपिड अॅक्शन फोर्सची (Rapid Action Force) स्थापना करण्यात आली. देशातील अंतर्गत सुरक्षा ठेवण्यासाठी केंद्र सरकारने या अर्धसैन्य दलाची स्थापना केली होती. देशभरात कुठेही दंगल होवो किंवा गर्दीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर या कामात रॅपिड अॅक्शन फोर्स अग्रेसर असतं. 

2001- अमेरिकेचा अफगाणिस्तावर हल्ला 

दहशतवाद्यांनी अमेरिकेच्या (US) ट्विन टॉवरवर 26 नोव्हेंबर रोजी हल्ला करुन या जुळ्या बिल्डिंग जमीनदोस्त केली. त्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं.नाटोच्या सैन्यानेही अमेरिकेच्या या भूमिकेला मान्यता दिली. या हल्ल्याचा सूत्रधार असलेला ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने 7 ऑक्टोबर 2001 रोजी अफगाणिस्तानवर (Afghanistan) पहिला हवाई हल्ला केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
Embed widget