Morning Headlines 7th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट; आजचं हवामान कसं असेल?
IMD Weather Update Today : देशात पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता (Unseasonal Rain) वर्तवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी दाट धुके पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे देशाच्या हवामानात बदल पाहायला मिळत असून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. यामुळे देशाच्या काही भागात थंडीही कमी झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता असून त्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : येत्या 3 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट
Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 3 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी हलक्या पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 7 जानेवारीला राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यत आहे. तर 8 जानेवारीला धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून पावसाची येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
Coronavirus : कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटपासून लहान मुलांचं संरक्षण कसं कराल? वृद्धांनाही धोका जास्त
Coronavirus Update : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (New Coron Varaint) कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोना (Covid-19) व्हायरसचा नवीन JN.1 व्हेरियंट (Corona JN.1 Variant) आतापर्यंत देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरला आहे, शुक्रवारपर्यंत सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन प्रकाराचा उपप्रकार आहे, त्यामुळे चिंता जास्त वाढली आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सर्व सब-व्हेरियंचच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे आणि हा विषाणू काळानुसार स्वत:मध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनत असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग लहान मुले आणि वृद्धांना होण्याचा धोका जास्त आहे. वाचा सविस्तर...
BEL Recruitment 2024 : कामाची बातमी! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती, डिप्लोमा पास लगेचच करा अर्ज
BEL Apprentice Recruitment 2024 : तुम्ही नोकरीच्या (Job News) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत 100 हून अनेक विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ पदे (Apprentice Job) भरण्यात येणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वाचा सविस्तर...
7th January In History : फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारला अमेरिकेकडून मान्यता, अभिनेता इरफान खानचा जन्म;आज इतिहासात
मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 6 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. 1857 मध्ये सरकारविरुद्ध बंडखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय बालकामगार विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी 1950 रोजी झाला. याबरोबरच अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. याबरोबरच कृष्णन शशिकिरण याचा जन्म 7 जानेवारी 1981 रोजी मद्रास येथे झाला. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याविषयी वाचा सविस्तर...
Horoscope Today 7 January 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 7 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 7 जानेवारी 2024 रोजी रविवार महत्वाचा आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आजच्या दिवशी कोणतेही काम घाईगडबडीत करणे टाळा, कोणतेही काम पूर्ण शांततेने करा. आज तुळ राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून करिअरमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे राशीभविष्य वाचा सविस्तर...