(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट; आजचं हवामान कसं असेल?
IMD Rain Alert : आज देशात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे तर काही ठिकाणी दाट धुक्यामुळे ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD Weather Update Today : देशात पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता (Unseasonal Rain) वर्तवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी दाट धुके पाहायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे देशाच्या हवामानात बदल पाहायला मिळत असून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. यामुळे देशाच्या काही भागात थंडीही कमी झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता असून त्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कुठे थंडी, कुठे पाऊस
आयएमडीच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये कडाक्याच्या थंडीची स्थिती कायम राहण्याची आणि त्यानंतर लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत वायव्य भारतात दाट ते दाट धुके कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. 8 ते 10 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात गडगडाटी वादळी वाऱ्यांसर गारपिटी आणि सक्रिय पाऊस पडण्याची शक्यता आहे.
North Coastal Tamil Nadu is likely to get isolated Heavy to Very heavy rainfall (115.6 to 204.4 mm) on 07th January, 2024. pic.twitter.com/QkgTIfuoLO
— India Meteorological Department (@Indiametdept) January 6, 2024
'या' भागात पावसाचा अंदाज
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडी तर कुठं ढगाळ वातावरण जाणावत आहेत. तर काही भागात पावसाची (Rain) शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात गारपीट आणि पावसाचा अंदाज आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील 5 दिवसांत तामिळनाडू आणि पुढील 2 दिवसांत केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 7 जानेवारीला उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी तापमानात घट होणार
राजस्थानच्या काही भागात तीव्र ते अत्यंत तीव्र थंडी जाणवण्याची शक्यता आहे. आज हरियाणा आणि चंदीगडच्या वेगळ्या भागांमध्ये दाट धुक्यासह गारठा पाहायला मिळेल. 9 जानेवारीपर्यंत देशात काही ठिकाणी तापमानात घट होणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.