7th January In History : फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारला अमेरिकेकडून मान्यता, अभिनेता इरफान खानचा जन्म;आज इतिहासात
On This Day In History : 7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 6 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. 1857 मध्ये सरकारविरुद्ध बंडखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय बालकामगार विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 7 जानेवारी 1950 रोजी झाला. याबरोबरच अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. याबरोबरच कृष्णन शशिकिरण याचा जन्म 7 जानेवारी 1981 रोजी मद्रास येथे झाला. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
1862 : शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरच्या विरोधात खटला सुरू झाला
7 जानेवारी रोजी ब्रिटीश सरकारने शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा विरुद्ध खटला सुरू केला होता. 1857 मध्ये सरकारविरुद्ध बंडखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. भारताच्या या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी जफरला मोठी किंमत चुकवावी लागली. त्याला रंगूनला कैदी नेण्यात आले, जिथे तो 1862 मध्ये मरण पावला. देशाने त्यांच्या योगदानाचा गौरव केला आणि अनेक रस्त्यांना त्यांचे नाव देण्यात आले. पाकिस्तानातील लाहोर शहरातही त्यांच्या नावाने एक रस्ता आहे. बांगलादेशातील ढाका येथील व्हिक्टोरिया पार्कचे नामकरण बहादूर शाह जफर पार्क असे करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिकांना पाठिंबा दिल्याबद्दल ब्रिटीश सरकारने त्यांना रंगून (आता म्यानमार) येथे हद्दपार केले होते. 1857 चा उठाव मोडून इंग्रजांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. या उठावाचा नामधारी प्रमुख होता दिल्लीश्वर सम्राट बहादूर शाह जफर. दिल्ली काबीज केली हे दाखवून देण्यासाठी बादशाहाला पकडणं इंग्रजांसाठी महत्त्वाचं होतं. यासाठी कॅप्टन विल्यम हॉडसनवर जबाबदारी सोपवण्यात आली. हॉडसनच्या नेतृत्वाखाली 100 सैनिक बादशाहाला पकडण्यासाठी रवाना झाले होते. बादशहाने हुमायूनच्या कबरीत आश्रय घेतला होता. हॉडसन जेव्हा हुमायूनच्या कबरीकडे निघाला तेव्हा वाटेत एकाही बंडखोराने त्याच्यावर किंवा त्याच्या सैन्यावर गोळीबार केला नव्हता.
1950 : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय बालकामगार विरोधी कार्यकर्त्या शांता सिन्हा यांचा जन्म
प्रो. शांता सिन्हा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बालकामगार विरोधी कार्यकर्त्या आहेत. त्या मम्मीदिपुडी वेंकटरंगिया फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत, ज्याला MV फाउंडेशन म्हणून ओळखले जाते. याबरोबरच त्या हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लागोपाठ दोन वेळा (प्रत्येकी 3 वर्षे) राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (NCPCR) ची स्थापना मार्च 2007 मध्ये बाल संरक्षण कायदा, 2005, संसदेच्या कायद्याद्वारे (डिसेंबर 2005) करण्यात आली. ) अंतर्गत केली होती. प्रोफेसर सिन्हा यांना 1998 मध्ये भारत सरकारने पद्मश्री या नागरी सन्मानाने सन्मानित केले.
1959: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली
क्युबाचा महान क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोच्या सरकारला 7 जानेवारी 1959 रोजी अमेरिकेने मान्यता दिली.क्युबामध्ये साम्यवादी विचारसरणीने क्रांती केल्यानंतर फिडेल कॅस्ट्रो 1959 ते 1976 या काळात त्या देशाचा पंतप्रधान होता. त्यानंतर 1976 ते 2008 सालापर्यंत त्याने अध्यक्षपद सांभाळलं. साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या आधारे फिडेल कॅस्ट्रो याने क्युबात क्रांती केली. त्याने स्थापन केलेल्या ‘26 जुलै मूव्हमेंट’ या संघटनेला तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि क्युबात त्याच्या नेतृत्वाखाली नव्या साम्यवादी विचारसरणीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यानं तब्बल 47 वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. त्याच्या काळात साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक पाऊले उचलली. अमेरिकेने जवळपास 45 वर्षांहून जास्त काळ क्युबावर आर्थिक निर्बंध लादले. तरीही फिडेल कॅस्ट्रो डगमगला नाही. अमेरिकेची गुप्तहेर संघटना असलेल्या सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला अनेकदा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरला.
1967 : अभिनेता इरफान खान याचा जन्म (Irrfan Khan)
अभिनेता इरफान खान याचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी झाला. त्यांना पद्मश्री आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. इरफान खान यांचे दिर्घ आजाराने 54 व्या वर्षी 29 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या इरफान खानने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगासमोर नाव कमावले. सुमारे 30 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, तसेच ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपटांमध्येही योगदान दिले. इरफानने 1995 मध्ये सुतपाशी लग्न केले, जी त्याच्यासोबत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये होती. इरफानला दोन मुले आहेत.
1979 : हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासूचा वाढदिवस (Bipasha Basu)
अभिनेत्री बिपाशा बसूचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी झाला. बिपाशा तमिळ, तेलुगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्रींपैकी एक बिपाशा बासूला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेषतः थ्रिलर आणि हॉरर चित्रपट शैलीतील कामासाठी तिला ओळखले जाते.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1978 : एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका महासागरात बेपत्ता झाली
1981 : भारताचा प्रसिद्ध बुद्धिबळपटू कृष्णन शशिकिरण यांचा जन्म
2010 : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातील एका हॉटेलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक