एक्स्प्लोर

Morning Headlines 5th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

100 व्या मराठी नाट्य संमेलनाचा आज शुभारंभ, शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर येणार?

Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (100th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आज शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  आज संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलाय. या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमधे शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि अजित पवारांची (NCP Ajit Pawar) नावे आहेत.  गेल्या काही दिवसांमधे अजित पवारांन शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलय. त्यामुळे नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यास शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे... वाचा सविस्तर 

Sana Khan Case: सना खान यांच्याकडे तीन मोबाईल होते, आरोपींनी नष्ट नाही केले, लपवलेत; सना खान यांच्या आईचा खळबळजनक दावा

Nagpur Sana Khan Case: नागपूर : राज्यासह (Maharashtra News) संपूर्ण देश हादरवणाऱ्या नागपुरातील (Nagpur Crime News) सना खान हत्या प्रकरणात (Sana Khan Murder Case) आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सना खान यांच्याकडे तीन मोबाईल फोन होते, त्यातील फक्त एकच मोबाईल पोलिसांना सापडला आहे, असा खळबळजनक दावा सना खान यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, सना खान यांचे इतर दोन फोन आरोपींनी लपवून ठेवले आहेत, ते दोन फोन पोलिसांनी शोधावेत, अशी मागणीही सना खान यांच्या आईनं केली आहे... वाचा सविस्तर 

रेकॉर्ड ब्रेक! मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थांना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज!

IIT Bombay Placement : मुंबई आयआयटीतील (IIT-B) प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई आयआयटीत (IIT-B) सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरांच्या प्रस्तावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. यंदा 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.  पहिल्या टप्प्यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगस्थित एकूण 63 आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी (job offers) या पहिल्या टप्यात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या... वाचा सविस्तर 

CBSE Board Exam 2024: सीबीएसई बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर; कधी होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा?

CBSE Board Exam 2024 Date Sheet Out: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशननं (Central Board of Secondary Education) काही दिवसांपूर्वी इयत्ता दहावी (10th CBSE Board Exam 2024) आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक (12th CBSE Board Exam 2024) जाहीर केलेलं. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जे विद्यार्थी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसणार आहेत, त्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन परीक्षेचं वेळापत्रक पाहता येणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आपलं वेळापत्रक पाहू शकतात. तसेच, विद्यार्थी हे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोडही करू शकतात... वाचा सविस्तर

लोकसभेपूर्वी भाजपचा 'मेगाप्लान'; भाजपच्या आमदारांना अयोध्येत नागरिकांना नेण्यासाठी टार्गेट, 'राम दर्शन विशेष ट्रेन' सुरू करण्याचा विचार

Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात आलेल्या भव्य प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा (Shri Ram Mandir) उद्घाटन सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. डोळे दिपवणारा हा सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी प्रशासनाकडून अनेक मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. तसेच, देशभरातील जनतेलाही रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपच्या (BJP) काही आमदारांना अयोध्येत लोकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे... वाचा सविस्तर 

महाराष्ट्रात काँग्रेसला किती जागा हव्यात? अलायन्स कमिटीनं राहुल गांधींकडे दिला रिपोर्ट

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. एनडीए (NDA) आणि इंडिया (I.n.d.i.a) आघाडीने लोकसभेची जोरदार (lok sabha election 2024) तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राज्यात लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया आघाडीसमोरही जागावटपाचा पेच आहे. यादरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीने (Alliance Committee) महत्वाच्या राज्यातील जागावाटपाचा रिपोर्ट पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागेंची संख्या सांगण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली, यामध्ये देशभरातील महत्वाचे काँग्रेस नेते उपस्थित होते... वाचा सविस्तर

Pariksha Pe Charcha 2024: लवकरच मोदींसोबत विद्यार्थ्यांची 'परीक्षा पे चर्चा'; कधी, कुठे अन् कसा होणार कार्यक्रम?

PM Modi To Address Students In January End: नवी दिल्ली : यंदा 'परीक्षा पे चर्चा' 2024 (Pariksha Pe Charcha 2024) कार्यक्रम जानेवारीच्या अखेरीस होणार असल्याची माहिती मिळत आहे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी घेत असलेल्या या विशेष कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची विद्यार्थी आणि पालकांमध्ये विशेष क्रेझ असल्याचं नेहमीच पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधू शकतात... वाचा सविस्तर 

कधीकाळी अमेरिकेत विकलेत बर्गर, वॉचमनची नोकरीही केली; आता अब्जाधीशांच्या यादीत सामील झालंय 'या' भारतीयाचं नाव

Indian Origin American Nikesh Arora: मुंबई : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती (American Businessman of Indian Origin) निकेश अरोरा (Nikesh Arora) सध्या चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे, त्यांचं नाव ब्लूमबर्ग (Bloomberg) अब्जाधीशांच्या निर्देशांकात समाविष्ट केलं आहे. एवढंच नाही तर, ते काही अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे गैर-संस्थापक आहेत. म्हणजेच, अरोरा यांनी स्वत: कोणतीही कंपनी सुरू केलेली नाही, तरीही ते अब्जाधीश झाले आहेत. विचारात पडलात ना? पाहुयात निकेश अरोरा नेमकं करतात काय? वाचा सविस्तर 

IND vs SA : खेळपट्टीवरुन रोहितचा आयसीसीला 'यॉर्कर'

केपटाऊन कसोटी. पहिला डाव - दक्षिण आफ्रिका 23.2 षटकांत सर्वबाद 55. भारत पहिला डाव - 34.5 षटकांत सर्वबाद 153, दक्षिण आफ्रिका - दुसरा डाव - 36.5षटकांत सर्वबाद 176, भारत - दुसरा डाव - 12 षटकांत तीन बाद 80. निकाल - भारत सात विकेट्सनी विजयी... वाचा सविस्तर 

5th January In History: आजच्याच दिवशी खेळवला गेला पहिला वनडे क्रिकेट सामना, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आणि सी. रामचंद्र यांचे निधन ;आज इतिहासात  

आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 5 जानेवारी 1971 रोजी किक्रेट विश्वाच्या इतिहासातला पहिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे पेशवे यांनी 5 जानेवारी 1671 रोजी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्ला जिंकून घेतला. 1982 मध्ये सी रामचंद्र यांचे निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या घडामोडी घडल्या हे सविस्तर जाणून घेऊयात... वाचा सविस्तर 

Horoscope Today 5 January 2024 :  आजचा शुक्रवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 5 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 5 जानेवारी 2024 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, कर्क राशीच्या लोकांना आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना आज भरपूर लाभाच्या संधी मिळू शकतात. तूळ राशीच्या लोकांना आज आरोग्याची खूप काळजी वाटेल, गुडघ्यांचा त्रास वाढू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget