सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM Superfast
सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM Superfast
हे ही वचा..
टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या 2 हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे. तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे.
या प्रकरणतील व्हिसलब्लोअर्स ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं त्यांनं फसवणूक करणाऱ्या युक्रेनच्या आरोपींनी 200 कोटीहून अधिकची रक्कम परदेशात वळवली आहे, असा दावा केलाय. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता ईडीकडून स्वंतत्र रित्या केला जाणार असून प्रत्येक आरोप ईडीकडूनही पडताळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयरच्या आधारे ईडीनं ईसीआयआर जारी केला आहे. शिवाजी पार्क पोलिसांकडील तक्रारीत भाजी विक्रेत्यानं जवळपास 1.25 लाख गुंतवणूकदारांनी टोरेसमध्ये गुंतवणूक केल्याचा दावा केला होता.