Morning Headlines 31th January : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Weather Update : काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी! पुढील 24 तासात 'या' भागात पावसाची शक्यता; वेस्टर्न डिस्टबर्न्सचा परिणाम
IMD Weather Updates : पुढील 24 तासात देशाच्या काही भागात पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशाच्या हवामानात बदल दिसून येत आहे. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला देशात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतील. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम (Cold Weather) आहे, त्यातच काही भागात पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Maharashtra Weather : महाराष्ट्रात गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Today : पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट (Cold Weather) होण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाचा सविस्तर...
FASTag : आजच करा 'हे' काम नाहीतर, 31 जानेवारीनंतर बंद होणार फास्टॅग; फास्टॅगसाठी KYC अपडेट कसं करावं?
NHAI FASTag Rules Update : फास्टॅग (FASTag) वापरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. फास्टॅग वापरायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारी आधी एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे, नाहीतर तुमचा फास्टॅग बंद होईल. फास्टॅग वापरायचं असेल तर 31 जानेवारी आधी KYC (Know your Customer) करुन घ्या नाहीतर, फास्टॅग वापरता येणार नाही. वाचा सविस्तर...
मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये- मद्रास कोर्ट
Madras High Court : मंदिरात ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये, हे काय पिकनिक स्पॉट आहे नाही, असे मद्रास हायकोर्टानं (Madras High Court ) सांगितलं आहे. तमिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने (Arulmigu Dhandayuthapaniswamy Temple) अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, अशी याचिका मद्रास कोर्टात दाखल केली होती. त्याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. वाचा सविस्तर...
UPS Layoff : जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
UPS Layoff 2024 : सध्या विविध क्षेत्रात नोकरकपातीचं संकट दिसून येत आहे. आता आणखी एका दिग्गज कंपनीकडून मोठी नोकरकपात (Layoffs) करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या पार्सल डिलिव्हरी (Parcel Delivery Company) कंपनी युपीएस (UPS) हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) ही जगातील सर्वात मोठी पार्सल वितरण कंपनी 12,000 कामगारांना कामावरून कमी करण्याची तयारीत आहे. वाचा सविस्तर...
U19 World Cup : वर्ल्ड कपमध्ये युवा ब्रिगेडचा विजयरथ सुरुच, न्यूझीलंडला 214 धावांनी लोळवलं!
India U19 vs New Zealand U19 : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा ब्रिगेडचा विजयरथ सुरुच आहे. सुपर 6 च्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 214 धावांनी दारुण पराभव केला. भारताचा हा सलग चौथा विजय होय. मुशीर खान याचं तडाखेबाज शतक आणि सौम्य पांड्याचा भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिलाय. भारताने प्रथम फलंदाजी करताना 295 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंडचा संघ 81 धवांत गारद झाला. वाचा सविस्तर...
Horoscope Today 31 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 31 January 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 31 जानेवारी 2024 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल असेल, आज सिंह राशीच्या लोकांनी आपल्या स्वभावातही थोडी नम्रता आणावी. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...