search
×

FASTag : आजच करा 'हे' काम नाहीतर, 31 जानेवारीनंतर बंद होणार फास्टॅग; फास्टॅगसाठी KYC अपडेट कसं करावं?

FASTag KYC, FASTag Update : केवायसी अपडेट न केलेले फास्टॅग ब्लॅक लिस्ट करण्यात येतील. फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची आज शेवटची तारीख आहे, नाहीतर फास्टॅग बंद होईल.

FOLLOW US: 
Share:

NHAI FASTag Rules Update : फास्टॅग (FASTag) वापरणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. फास्टॅग वापरायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारी आधी एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे, नाहीतर तुमचा फास्टॅग बंद होईल. फास्टॅग वापरायचं असेल तर 31 जानेवारी आधी KYC (Know your Customer) करुन घ्या नाहीतर, फास्टॅग वापरता येणार नाही. फास्टॅग केवायसी (FASTag KYC) अपडेट करण्यासाठी आज 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. 31 जानेवारी पर्यंत केवायसी अपडेट न केलेले फास्टॅग ब्लॅक लिस्ट करण्यात येतील. फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची आज शेवटची तारीख आहे, नाहीतर फास्टॅग बंद होईल.

KYC न केल्यास फास्टॅग बंद होणार (FASTag will be Inactive After 31 January)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे. 31 जानेवारीनंतर केवायसी (KYC - Know your Customer) ने केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, 31 जानेवारी पूर्वी फास्टॅगचे केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे, अशी घोषणा NHAI ने केली आहे. केवायसी (KYC) न केल्यास 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टॅग बंद होईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचण येईल आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी फास्टॅग केवायसी करून घ्या. 

लगेचच फास्टॅग केवायसी अपडेट करा (FASTag KYC in Complusory)

तुम्हाला फास्टॅग केवायसी वेळेनुसार अपडेट करावं लागणार आहे. नाहीतर 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला फास्टॅग वापरता येणार नाही. तुम्ही घरी बसून फास्टॅग केवायसी अपडेट करू शकता. ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तुम्हाला सहज फास्टॅग केवायसी अपडेट करता येईल. फास्टॅग सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही ताबडतोब केवायसी करावं लागणार आहे. 

1 फेब्रुवारीपासून 'हे' FASTag बंद (These FASTags to become inactive after January 31)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारीपर्यंत फास्टॅग केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल, तर केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे 31 जानेवारीपर्यंत शेवटची मुदत आहे. 1 फेब्रुवारीपासून KYC न केलेले फास्टॅग निष्क्रिय करण्यात येतील. फास्टॅग ब्लॅकलिस्ट केल्यानंतर फास्टॅगमध्ये रक्कम शिल्लक असूनही पेमेंट होणार नाही.

FASTag साठी KYC अपडेट कसं करावं?

  • तुमचं फास्टॅग KYC अपडेट करण्यासाठी सर्वात आधी FASTag च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या फोनवर मिळालेला OTP वापरून लॉगिन करा.
  • होमपेजवर, "माय प्रोफाइल" विभाग पाहा आणि KYC टॅबवर क्लिक करा.
  • सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुमचं फास्टॅग केवायसी पूर्ण होईल.

FASTag KYC साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

FASTag KYC साठी वाहन नोंदणी प्रमाणपत्र, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

Published at : 31 Jan 2024 07:48 AM (IST) Tags: Car bank fastag NHAI KYC FASTag KYC

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  

T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  

Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी

Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी