एक्स्प्लोर

Morning Headlines 30th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Unesco World Heritage List: शिवरायांचा आठवावा प्रताप! युनेस्कोच्या मान्यतेसाठी भारताकडून मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावं; कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश?

Unesco World Heritage List 2024-25: नवी दिल्ली : युनेस्को वर्ल्ड हेरिटेज (Unesco World Heritage List) साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकनं पाठवत असतो. यंदा भारताकडून (India) युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग (Sindhudurg), अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे... वाचा सविस्तर 

Weather Update : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे हवामानात बदल, पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; 'या' भागात वरुणराजा बरसणार

IMD Weather Updates : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे पुन्हा एकदा देशाच्या हवामानात बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात काही भागात थंडीची तीव्र लाट (Cold Wave) पाहायला मिळत असून काही भागात पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात तीव्र थंडी आणि दाट धुके जाणवत आहे, यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीत 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्लीतील दिवसाच्या तापमानात आणखी घट होऊ शकते... वाचा सविस्तर 

शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू सुसाट! दररोज 30 हजार वाहनांची ये-जा, दहा दिवसांत 61 लाखांचा टोल जमा

मुंबई : रायगड जिल्ह्यातल्या उरण-अलिबागसह कोकणात किंवा पुण्यामार्गे दूरचा प्रवास करण्यासाठी मुंबईकरांची सध्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूला (Shivdi Nhava Sheva Atal Setu) मोठी पसंती मिळत आहे.  21 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूवरून दररोज तब्बल 30 हजार वाहनं ये-जा करत आहेत. त्यामुळं गेल्या दहा दिवसांत टोलच्या माध्यमातून तब्बल 61 लाख 50 हजार रुपयांचा महसूल एमएमआरडीएला मिळाला आहे... वाचा सविस्तर 

FD Interest Rate : SBI पासून HDFC पर्यंत, करबचत एफडीवर 'या' बँकाकडून सर्वाधिक व्याज

FD Interest Rate : तुम्हीही आयकर स्लॅबमध्ये (Income Tax Slab) येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्ही आयकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक (Investment) दाखवून करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. 2023-24 आर्थिक वर्ष संपायला दोन महिने बाकी आहेत. यावेळी तुम्ही कर नियोजन लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल, नाहीतर तुम्हाला अधिक आयकर भरावा लागू शकतो... वाचा सविस्तर 

India Vs England 2nd Test: टीम इंडिया अडचणीत! 4 दिग्गजांशिवाय टीम इंडिया खेळणार इंग्लंडविरोधातील दुसरी कसोटी

India Vs England 2nd Test: इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर असून टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) क्रिकेट संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पण ही पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी मात्र आव्हानात्मक ठरतेय एवढं मात्र नक्की. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुसऱ्या कसोटीत इग्लंडला नमवण्यासाठी टीम इंडियाचे धुरंदर सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत. पण यामध्ये त्यांचा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे... वाचा सविस्तर 

30th January In History: हुतात्मा दिन, महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या; आज इतिहासात

30 January In History:  इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. आजच्या दिवशी 30 जानेवारी काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ज्याचा परिणाम देशावर झाला. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने  हत्या केली होती. जाणून घेऊयात इतिहासातील आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 

Horoscope Today 30 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 30 January 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 30 जानेवारी 2024 रोजी, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, आज वृषभ राशीचे लोक त्यांच्या संपत्तीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. आज सिंह राशीचे तरुण धार्मिक कार्यात त्यांचा अधिक वेळ घालवू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget