एक्स्प्लोर

Horoscope Today 30 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 30 January 2024: 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 30 January 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 30 जानेवारी 2024 रोजी, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, आज वृषभ राशीचे लोक त्यांच्या संपत्तीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. आज सिंह राशीचे तरुण धार्मिक कार्यात त्यांचा अधिक वेळ घालवू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामात कोणीही ढवळाढवळ करू नये, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं काम काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुमच्या व्यवसायात काही समस्या असतील तर तुम्ही संयमाने काम करावं. फक्त तुमच्या कामावर नीट लक्ष केंद्रित करा. तुमची बिघडलेली परिस्थिती देखील सुधारू लागेल.

मेष राशीच्या लोकांनी आज वागण्यावर नियंत्रण ठेवावं आणि तुमच्या स्वभावातही थोडी नम्रता आणा, अन्यथा कटू वागणूक नात्यांत दुरावा निर्माण करू शकते. तुम्ही तुमच्या लोकांचा सहवास गमावणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल तर गोड पदार्थ खाणं टाळा, नाहीतर अडचणीत येऊ शकता. मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानाची मदत घ्यावी.  

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काही वादात अडकू शकता आणि तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही आव्हानात्मक काम देऊ शकतात, जे पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी येतील. देव तुमची परीक्षा घेत आहे हे समजून घ्या. व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा आव्हानात्मक असेल, परंतु तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्ही तुमच्या विरोधकांचा पराभव करू शकाल. तुमचे विरोधक जे तुमचे व्यवसायात नुकसान करू पाहत होते ते आज तुमच्याकडून पराभूत होतील.  

तरुणांबद्दल सांगायचं तर, तरुणांनी काल्पनिकतेवर जगू नये, ज्या गोष्टी हव्या त्यासाठी मेहनत करा, तरच यश मिळेल. काल्पनिक जगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुम्ही त्यात अडकून राहू शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून गंभीर विषयांवर शांततेने चर्चा करू शकता. कुटुंबाशी सल्लामसलत करून तुम्ही त्या समस्या सोडवू शकता. आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही जर हार्ट पेशंट असाल तर तुम्ही आज कोणत्याही प्रकारचा ताण टाळा आणि तुमची औषधं वेळेवर घेत राहा.  

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात, यामुळे तुमचे अधिकारीही तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमची जबाबदारी हुशारीने पार पाडली पाहिजे. जर तरुणांबद्दल बोलायचं झालं तर, नवीन योजना आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन तुम्ही करिअरमध्ये प्रगती कराल.

आज तुम्ही तुमच्या आर्थिक बचतीकडे अधिक लक्ष द्याल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार नाही. त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच नियोजन सुरू करू शकता. आरोग्याविषयी बोलताना, आज तुमच्या घरात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही कुठे बाहेर जेवायला गेलात तर तिथेही स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, नाहीतर तुम्ही आजारांना बळी पडू शकता. 

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

आज तुमच्या मनात काही नवीन विचार येतील, तुमचं मन त्याच विचारांमध्ये गुंतलेलं राहील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, व्यापारी वर्गाला कोणतेही काम करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर तुमची ताकद आणि चपळाई दिसेल, यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे चालेल. तरुणांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही आज फेक फोन कॉल्सपासून थोडं सावध राहावं, अन्यथा एखाद्या बनावट फोन कॉलमुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

आज तुमच्या कुटुंबात काही कलह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं कुटुंब तणावात राहील. तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं. आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही थंड आणि आंबट अन्न टाळावं, अन्यथा तुम्हाला टॉन्सिल किंवा घशाचा त्रास होऊ शकतो. 

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं काम तुमच्या इच्छेनुसार होत नसेल तर तुम्ही धीर धरा, चांगल्या वेळेची वाट पहा, हळूहळू सर्व कामं होतील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही कायदेशीर गुंतवणूक करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक दंडाला सामोरं जावं लागू शकतं. तरुण लोकांबद्दल बोलायचं तर, त्यांनी आज नवीन लोकांशी संवाद वाढवावा.

महिलांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला काही नवीन कोर्स करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. आरोग्याविषयी बोलायचं झालं तर,आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि तुम्ही खूप निरोगी असाल. 

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही थोडं डोकं लावा, तुमची हुशारी पाहून तुमचे अधिकारी आनंदी होतील आणि त्यांना तुमच्या कार्यक्षमतेचा मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी वर्गाला तांत्रिक कामात अडचणी येऊ शकतात, ज्याला तोंड देण्यासाठी तुम्ही आधीच तयारी करावी. तांत्रिक बिघाडामुळे तुम्हाला व्यवसायात मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

तरुणांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही जाणकारांच्या मार्गदर्शनाने कठीण प्रश्नांची उत्तरं सोडवू शकाल, ज्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीतही यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावं. आज तुम्हाला काही दु:खद बातम्या देखील मिळू शकतात, ज्यामुळे तुमचं मन खूप अस्वस्थ होऊ शकतं. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण आज महिलांनी त्यांच्या दिसण्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे.

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज ऑफिसमध्ये तुमचं मन प्रसन्न राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलाययचं झालं तर, व्यावसायिकांनी अजिबात अतिआत्मविश्वास बाळगू नये. मोठ्या नफ्यामुळे जास्त भारावून जाऊ नये, कारण कधीकधी मोठ्या नफ्यापेक्षा लहान नफ्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. तरुणांबद्दल बोलताना, आज तुम्ही भविष्याच्या दृष्टीने विचार करा आणि अभ्यासाला लागा.

जर तुमच्या कुटुंबात काही समस्या येत असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद आणि शांती येईल. आरोग्याबाबत बोलायचं झालं तर, ज्यांचं वजन खूप वेगाने वाढत आहे त्यांनी आपलं वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा वाढलेल्या वजनामुळे 100 आजार बळावू शकतात. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये इकडे-तिकडे गॉसिप करणाऱ्या लोकांपासून थोडी सावधगिरी बाळगा, कोणीतरी तुमच्या वरिष्ठांना तुमच्याबद्दल गॉसिप करेल. सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांची विक्री वाढण्याची दाट शक्यता आहे. फक्त तुमच्या उत्पादनांची श्रेणी लक्षात ठेवा आणि उत्पादनाच्या गुणवत्तेला महत्त्व द्या. तरुणांबद्दल सांगायचं तर, तरुणांनी आज हनुमानाची पूजा करावी, तुमची सर्व कामं पूर्ण होतील.  

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काही कठोर पावलं उचलावी लागली तरी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांबद्दल बोलायचं झालं तर, आज त्यांना हार्मोन्सशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. तुम्ही महिला डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करुन घ्या. 

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही ऑफिसची कागदपत्रं जपून ठेवावीत, कारण तुम्हाला त्यांची कधीही गरज पडू शकते आणि तुमचा बॉस तुम्हाला कधीही जाब विचारू शकतो. तुम्हाला त्यांची कधीही गरज पडू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात पैशाच्या व्यवहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कुणाचीही फसवणूक करू नका, पैशाच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कुटुंबातील सदस्यांना तुमच्या बदललेल्या स्वभावामुळे काही त्रास होऊ शकतो. तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमची तब्येत ठीक होत नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका, लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःवर उपचार करुन घ्या. 

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाची तुमच्या सहकाऱ्यांच्या कामाशी तुलना होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा बॉस तुमचे कौतुक करू शकेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित करारावर स्वाक्षरी करायची असेल, तर सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचून आणि काळजी घेऊनच करारावर स्वाक्षरी करा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.  

तरुणांबद्दल सांगायचं तर, त्यांनी आपल्या मार्गातील प्रत्येक संकट आणि आव्हानांना पराभूत करून पुढे जावं. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा आणि मोठ्या भावंडांचा अधिक आदर करा, त्यांच्याशी असलेलं तुमचं प्रेमळ नातं भविष्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या आरोग्याविषयी सांगायचं तर, तुम्ही मसाल्याचं तिखट अन्न खाणं टाळावं, अन्यथा ॲसिडिटी, गॅस, जळजळ इत्यादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. 

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या ऑफिसमधील तुमचे सहकारी तुम्हाला पूर्णत: सहकार्य करणार नाहीत, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल आणि काम करण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल, तुम्हाला ना फार फायदा होईल आणि ना तोटा.

आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला स्वतःला जास्त रिलॅक्स वाटेल. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुम्हाला पाठदुखी किंवा पायदुखी जाणवेल.

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची प्रलंबित कामं आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा संगणक डेटा गमावला जाणार नाही याची देखील काळजी घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, दूध दह्याचा व्यवसाय करणारे लोक आज अल्प नफा मिळवू शकतात. तरुणांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, अचानक राग येणं तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करू शकतं.

जर तुम्हाला घरातील काम करण्याची आवड असेल तर आज तुमच्या कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करू शकतात आणि तुम्ही तुमचं घर चांगलं ठेवू शकता. आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला डोळ्यांच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर कमी करावा, अन्यथा डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वेळोवेळी थंड पाण्याने डोळे धुवा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani 2024 : फेब्रुवारीत शनि आणि सुर्याची होणार युती; 'या' राशींना सोसावं लागणार नुकसान, राहा सतर्क

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
Garud Puran: तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Embed widget