(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 29th August : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिलाच, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर
मुंबई : महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे. वाचा सविस्तर
भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास कोचचे रुपांतर करणार जनरल कोचमध्ये
नवी दिल्ली : भारतात रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वे प्रत्येक वर्गानुसार प्रवासात सुविधा पुरवते. जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी ते डब्यापर्यंत प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात. मात्र जनरल डब्यातील प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने 21 ऑगस्ट रोजी दिले आहेत. विशेषत: दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हा प्लॅन लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर
आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल नाही, आजही दर स्थिरच!
Petrol Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे आजही देशात वाहनचालकांना दिलासा कायम आहे. बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईलनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच आहेत. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर
CBI कडून ED च्या सहाय्यक संचालकाविरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे सहायक संचालक पवन खत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मद्यविक्रेते अमनदीप ढल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन खत्री यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने खत्रीसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
मेष, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य...
Horoscope Today 29 August 2023 : आज वार मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, कन्या, तूळ आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहिल. वाचा सविस्तर
आज 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; हॉकीच्या जादूगाराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस
National Sports Day 2023 : आज 29 ऑगस्ट म्हणजेच 'राष्ट्रीय क्रीडा दिन'. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. वाचा सविस्तर
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म, अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन; आज इतिहासात
29th August In History: देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 29 ऑगस्ट या तारखेला अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. भारताच्या संदर्भात पाहिले तर या तारखेला तीन महान व्यक्तींचा जन्म झाला. 1905 मध्ये आजच्या दिवशी भारताला देश आणि जगात नावलौकिक मिळवून देणारे महान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. त्यांच्याशिवाय, 1949 मध्ये भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञ के. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. त्यांनीच मंगळ मोहिमेचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात भारताला यश मिळाले. या तारखेला 1969 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या मेजर मनोज तलवार यांचा जन्म झाला. वाचा सविस्तर