एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिलाच, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर
दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.
मुंबई : महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील सर्वाधिक एफडीआय अर्थात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा महाराष्ट्रात आलेला एफडीआय अधिक आहे.
2022-23 या आर्थिक वर्षांत 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 36,634 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यातील भक्कम सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे.
आनंदाची बातमी !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 28, 2023
2022-23 या आर्थिक वर्षांत ₹1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे.
डीपीआयआयटीने एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या… pic.twitter.com/fCOtzJ627k
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. महाराष्ट्राला गुंतवणुकीत पहिल्या स्थानावर आणले आहे.महाराष्ट्रला 2019 पर्यंत पहिल्या स्थानावर ठेवलं होतं. पण उद्धव ठाकरेचे सरकार आल्यानं महाराष्ट्र यादीतून बराच खाली जाऊन गुजरात पहिला क्रमांकावर गेले. मागील एका वर्षात महाराष्ट्रला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आता तिमाही रिझल्ट आले आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जरी कमी झाली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सत्तेत आल्यावर आम्ही घोषणा केली होती. महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू ते पूर्ण झालं आहे
महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली?
देशात गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीत महाराष्ट्रात 36 हजार 634 कोटींची परदेशी गुंतवणूक आली आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 29 टक्के आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1 लाख 18 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2023 या काळात महाराष्ट्रात चार लाख सात हजार कोटींची एकत्रित गुंतवणूक झाली. याच काळात कर्नाटकात 24 टक्के, गुजरातमध्ये 17 टक्के तर 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, , गुजरात, दिल्ली तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.