एक्स्प्लोर

Morning Headlines 27th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

PM Modi : पंतप्रधान मोदी 27-28 फेब्रुवारीला महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांना भेट देणार, विविध प्रकल्पांचे करणार उद्घाटन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 27-28 फेब्रुवारी रोजी केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना भेट देणार आहेत. 27 तारखेला पंतप्रधान केरळमध्ये तर 28 तारखेला तामिळनाडू आणि महाराष्ट्रात असतील. पंतप्रधान 27 फेब्रुवारी रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSSC) भेट देतील. त्याच दिवशी संध्याकाळी मदुराई, तामिळनाडू येथे क्रिएटिंग द फ्युचर, डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई उद्योजक कार्यक्रमात सहभागी होईल. वाचा सविस्तर...

Unseasonal Rain : पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

IMD Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे. वाचा सविस्तर... 

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; 10 जण जखमी

Jan Vishwas Yatra Convoy Accident : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात (Convoy Accident) झाल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जनविश्वास यात्रा सुरु आहे. दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या ताफ्याच्या गाडीला भीषण अपघात झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर...

Rajya Sabha Elections Result : राज्यसभेच्या 12 जागांसाठी आज मतदान! कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश विधानसभांमध्ये मतदान

Rajya Sabha Elections Result 2024 : आज तीन राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुका आहेत. राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. या जागा उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकातील आहेत. राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. तीन राज्यांतील 15 जागांसाठी आज सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार असून सायंकाळीच निकाल अपेक्षित आहे. वाचा सविस्तर...

Rahul Gandhi : 'हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं?' विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं...

Rahul Gandhi : 'भविष्यात ते देशाचे पंतप्रधान (Prime-Minister) झाले तर हिजाब (Hijab) परिधान करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे मत काय? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, महिलांना जे घालायचे ते परिधान करण्याचा अधिकार आहे, असे माझे मत असल्याचं ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Yatra) उत्तर प्रदेशात सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी अलीगड विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी येथील विद्यार्थिनींची भेट घेतली. वाचा सविस्तर...

Israel-Hamas War : इस्रायल-हमासमध्ये सुरू असलेले युद्ध आता संपणार का? रमजानच्या पार्श्वभूमीवर युद्धविरामावरील करार

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धा दरम्यान एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रमजानच्या (Ramadan) निमित्ताने या दोन्ही देशांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सशर्त करार जवळपास झाला आहे. पॅरिसमध्ये (Paris) शनिवारी यावर चर्चा झाली. ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगात बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याचा यात समावेश आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाला ही माहिती दिली. मात्र, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी याच्या उलट विधान केले असून करार होऊनही युद्ध थांबणार नसल्याचे सांगितले. वाचा सविस्तर...

Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 

Mohammed Shami Updates : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (mohammed shami) याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून (World Cup 2023) भारतीय संघाबाहेर होता. विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी (mohammed shami)  यानं भेदक मारा केला होता. पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली. एनसीएमध्येही (NCA) उपचार घेतले, पण  काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामी याच्या पायावरील सर्जरी (mohammed shami surgery) यशस्वी झाली आहे. शामीनं एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली. वाचा सविस्तर...

मंगळवारी ‘या’ राशींवर दिसेल गणपतीची कृपा, परिश्रमातून मिळेल यश; 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope 27 February 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget