एक्स्प्लोर

Mohammed Shami Surgery : शामीच्या पायाचं झालं ऑपरेशन, IPL आणि T20 वर्ल्ड कपला मुकणार? 

Mohammed Shami Updates : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

Mohammed Shami Updates : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (mohammed shami) याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून (World Cup 2023) भारतीय संघाबाहेर होता. विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी (mohammed shami)  यानं भेदक मारा केला होता. पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली. एनसीएमध्येही (NCA) उपचार घेतले, पण  काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शामी याच्या पायावरील सर्जरी (mohammed shami surgery) यशस्वी झाली आहे. शामीनं एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली. 

मोहम्मद शामी यानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो हॉस्पिटलमधील आहेत. कॅप्शनमध्ये शामीनं म्हटलेय की," आताच माझ्या घोट्याचं यशस्वी ऑपरेशन झालं. सर्वकाही सध्या ठीक आहे. मला सावरण्यासाठी वेळ लागेल. लवकरच पायावर उभं राहील." दरम्यान, मोहम्मद शामीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील चार महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. शामीला दुखापतीमधून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. शामी आयपीएलमध्येही खेळताना दिसणार नाही. तो आयपीएल 2024 ला मुकणार आहे. शामीच्या दुखापतीचा फटका गुजरात संघालाही बसणार आहे. त्याशिवाय टी 20 विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता आहे. 

मोहम्मद शामीनं नोव्हेंबर 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वनडे विश्वचषकाचा अंतिम सामन्यात शामी खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियानं सहा विकेटनं जिंकला होता. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियानं 4 विकेटच्या मोबदल्यात 43 षटकात हे आव्हान पार केले होते. भारताकडून मोहम्मद शामीनं एक विकेट घेतली होती. वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम मोहम्मद शामी यानं केला होता. शामीनं 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या. 
 
 गुजरातला मोठा धक्का -

वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शामी दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापत असतानाही मोहम्मद शामी यानं भारतासाठी विश्वचषक गाजवला होता. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेलाही तो मुकलाय. मोहम्मद शामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.स्टार गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. हा गुजरातसाठी मोठा धक्का मानला जातोय. गुजरातनं 2022 मध्ये आयपीएल पदार्पण केले, त्याचवर्षी त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर गेल्यावर्षी गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं. या दोन हंगमात मोहम्मद शामी यानं गुजरातकडून भेदक मारा करत विजयात मोलाचा वाटा उचललाय. पण आता दुखापतीमुळे मोहम्मद शामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget