एक्स्प्लोर

Morning Headlines 25th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

साहेबांना फिरकी रोखणार का? भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून कसोटीचा थरार 

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ( Ind vs Eng 1st Test ) पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर  (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) दोन्ही संघ (England vs India) भिडणार आहे. भारताने मागील 12 वर्षांत भारतामध्ये एकही कसोटी मालिका गमावलेली नाही, तर दुसरीकडे बॅझबॉल या अतिआक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकणारा इंग्लंडचा संघ असेल. कसोटी क्रिकेटमधील दोन बलाढ्या संघातील लढतीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. (वाचा सविस्तर)  

Gold Mine Collapse : मालीमध्ये सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 70 जणांचा मृत्यू

पश्चिम आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. माली (Mali gold mine) येथे गेल्या आठवड्यात सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत (gold mine collapsed in Mali) किमान 70 लोकांना आपला जीव गमावला आहे. ज्या ठिकाणी नेहमीच खाण कोसळण्याचा धोका असतो, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेबद्दल खाण मंत्रालयाने खेद व्यक्त केला आहे. त्याशिवाय खाण कामगारांना सुरक्षा आवश्यकतांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अल जजीराने खाण दुर्घटनेबाबत वृत्त दिले आहे.  (वाचा सविस्तर)  

Weather Update : आजही राज्यात थंडी कायम, बहुतांश जिल्ह्यात तापमानात घट; तर उत्तर भारतातही पारा घसरला

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे, असा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला  तर थंडीपाससून बचाव करण्यासाठी अनेकांनी घेतला शेकोटीचा आसरा घेतल आहे. (वाचा सविस्तर)  

Manoj Jarange: मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात, काही तासातच पोहचणार मुंबईच्या वेशीवर

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले  आहेत. लवकरच मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंच्या (Manoj Jarange)  आंदोलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत.. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीये. त्यामुळे मराठ्यांचं वादळ थोपवण्यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरु आहेत. मराठा बांधवाची गर्दी पाहता आज पावणे सात वाजता मराठा मोर्चा  लोणावळ्यात पोहचला आहे. (वाचा सविस्तर)

  'हरिद्वारमध्ये गंगेत आंघोळ केल्याने कर्करोग बरा होईल...' 5 वर्षाचा निष्पाप बालक ठरला अंधश्रद्धेला बळी!

हरिद्वार परिसरात बुधवारी दुपारी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे रक्ताच्या कर्करोगाशी झुंजत असलेल्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हरिद्वारमध्ये गंगेत बुडवल्यानंतर आजार बरा होईल, या अंधश्रद्धेतून या बालकाच्या नातेवाईक महिलेने त्याला काही वेळेसाठी पाण्यात बुडवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. (वाचा सविस्तर)  

National Tourism Day 2024 : पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारा राष्ट्रीय पर्यटन दिन; वाचा या दिनाचा इतिहास 

आज राष्ट्रीय पर्यटन दिन (National Tourism Day). भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसेच लोकांना शिक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दिनानिमित्त आज आपण पर्यटनाचे महत्त्व, उद्देश आणि इतिहास यांविषयी जाणून घ्या.  (वाचा सविस्तर)  

National Voters Day 2024 : आज साजरा केला जातोय 'राष्ट्रीय मतदार दिन'; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व

आज राष्ट्रीय मतदार दिन (National Voters Day).लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय? तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो? मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी? याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे? हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं.   (वाचा सविस्तर)  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget