Morning Headlines 20th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Parliament Special Session 3rd Day: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; लोकसभा अन् राज्यसभेत कोणती विधेयकं मांडली जाणार?
Parliament Special Session 3rd Day: संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या (Parliament Special Session) तिसऱ्या दिवसाचं कामकाज बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. आज केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) विविध विधेयकं मांडणार आहेत. काही विधेयकांवर संसदेत चर्चा होणार असून सरकार या विधेयकाच्या बाजूनं आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे आज बुधवारी संसदेचं कामकाज गोंधळात पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Canada India Tension: दहशतवाद्याच्या हत्येनं भारत कॅनडात तणाव; 30 भारतीय कंपन्यांची चिंता वाढली, कॅनडालाही फटका बसणार
Canada India Tension: दिल्लीत जी-20 समुहाची बैठक पार पडली. त्याच बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्यात एक विषेश बैठक पार पडली, या बैठकीत दोन्ही नेत्यांनी खलिस्तान्यांवरच चर्चा केली. त्याच बैठकीचा उल्लेख करत भारतातून कॅनडात परतल्याच्या तिसऱ्या दिवशीच कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडोंनी भारतावर गंभीर आरोप केले (Canada India Tensions) आणि संपूर्म जगभरात खळबळ माजली. भारतानं कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले असून कॅनडाच्या उच्चायुक्तांनीही देश सोडण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावामुळे व्यापारी जगतात चिंता वाढली आहे. वाचा सविस्तर
India-Canada Relations: "जम्मू-काश्मीरला जाऊ नका, तिथे..."; भारतासोबतच्या वादविवादात कॅनडाकडून नागरिकांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी
India-Canada Relations: खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं (Canada) मंगळवारी (19 सप्टेंबर) आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये कॅनडानं आपल्या देशातील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये न जाण्यास सांगितलं आहे. कॅनडानं यामागे देशातील नागरिकांच्या सुरक्षेचं कारण दिलं आहे. अपडेटेड अॅडव्हायजरीमध्ये कॅनडानं म्हटलंय की, "जम्मू काश्मिरमध्ये जाऊ नका, कारण तिथे दहशतवाद, अतिरेकी, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे." वाचा सविस्तर
Mohammed Shami: वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शामीला मोठा दिलासा; पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर
Mohammed Shami Gets Bail: भारतीय क्रिकेट संघाचा (INDIAN CRICKET TEAM) वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला (Mohammed Shami) वर्ल्डकप (ODI World Cup 2023) सुरू होण्यापूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (19 सप्टेंबर) रोजी पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणात मोहम्मद शामीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मोहम्मद शामीच्या पत्नीनं त्याच्या गंभीर आरोप केले आहेत. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मोहम्मद शामीला अलीपूर कोर्टानं सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शामी कोर्टात हजर राहिला होता, याप्रकरणावरील सुनावणी पार पडली. अखेर सुनावणीअंत अलीपूर कोर्टानं मोहम्मद शामीला जामीन मंजूर केला. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीपूर्वीच मोहम्मद शामीच्या वतीनं जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. वाचा सविस्तर
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी बाप्पाचं आगमन; फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला,"भरपूर मोदक खाण्यासाठी..."
Shah Rukh Khan Welcomes Ganapati Bappa at Mannat : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाले आहेत. किंग खानने बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्याने बसवलेली बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे. किंग खानने गणपतीचा फोटो शेअर करत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi 2023) शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा सविस्तर
20 September In History : ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात 1857 चे बंड मोडून काढले , विचारवंत दया पवार यांचे निधन ; आज इतिहासात
मुंबई : 20 सप्टेंबर रोजी जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 1857 साली करण्यात आलेल्या राष्ट्रीय उठवानंतर ब्रिटीश सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली होती. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओवर खटला भरण्यात आला होता. ब्रिटनमध्ये वाफेवर चालणारी पहिली बस सुरु झाली. थोर समाजसुधारक नारायण गुरु यांचे निधन झाले. ब्रिटीशांच्या जातीय निवाड्याविरोधात गांधींजींना आमरण उपोषणास सुरुवात केली. तसेच फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलची आजच्याच दिवशी सुरुवात झाली होती. वाचा सविस्तर
20 September 2023 Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा राहील बुधवार? जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य
20 September 2023 Horoscope : राशीभविष्यानुसार 20 सप्टेंबर 2023 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम करतील, वृषभ राशीचे लोक छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाहीत. इतर राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर