एक्स्प्लोर

20 September In History : ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात 1857 चे बंड मोडून काढले , विचारवंत दया पवार यांचे निधन ; आज इतिहासात

20 September In History :आजच्याच दिवशी केरळमधील समाजसुधारक नारायण गुरु यांचे निधन झाले होते. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओविरोधात खटला भरण्यात आला होता.

मुंबई : 20 सप्टेंबर रोजी जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेक घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी 1857 साली करण्यात आलेल्या राष्ट्रीय उठवानंतर ब्रिटीश सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली होती. तर  पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओवर खटला भरण्यात आला होता. ब्रिटनमध्ये वाफेवर चालणारी पहिली बस सुरु झाली. थोर समाजसुधारक नारायण गुरु यांचे निधन झाले. ब्रिटीशांच्या जातीय निवाड्याविरोधात गांधींजींना आमरण उपोषणास सुरुवात केली. तसेच फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलची आजच्याच दिवशी सुरुवात झाली होती. 

1633- पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओवर खटला

अंतराळातील जग हे सूर्याच्या भोवती केंद्रीत झाले असून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असं सर्वात प्रथम सांगणाऱ्या गॅलिलिओवर इटलीतील चर्चने आजच्याच दिवशी  खटला भरला होता. दरम्यान त्याकाळी अंतराळातील पृथ्वी हा केंद्रबिंदू असून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असा समज होता. पण गॅलिलिओने त्यावर संशोधन करुन पृथ्वी सुर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला.  1610 मध्ये गॅलिलिओने ' द स्टारी मेसेंजर' नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामध्ये त्याने अंतराळातील अनेक विषयांची माहिती दिली होती. त्याविरोधात गॅलिलिओवर खटला भरण्यात आला. पण गॅलिलिओचा सिद्धांत हा खरा असल्यांच पुढील काही काळात सिद्ध करण्यात आलं. 

1831- ब्रिटनमध्ये वाफेवर चालणारी पहिली बस सुरू

सुरुवातीच्या काळामध्ये वाफेवर चालणारी वाहने प्रामुख्याने केला जात होता. त्यातच 20 सप्टेंबर 1831 मध्ये ब्रिटनच्या गोल्डन ब्रॉन्झ यांनी वाफेवर चालणारी पहिली बस निर्माण केली. धीम्या गतीने सुरुवातील ही बस सेवा सुरु करण्यात आली. तर सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 30 प्रवासी प्रवास करु शकत होते. 

1856- थोर समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन

नारायण गुरु यांनी अस्पृशांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी वायकोम सत्याग्रह सुरू केला. त्यांचं निधन 20 सप्टेंबर 1856 रोजी झालं. केरळमध्ये त्यांची पुण्यतीथी ही श्री नारायण गुरु समाधी दिन (Sree Narayana Guru Samadhi) म्हणून पाळला जातो.  नारायण गुरु यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपूरम या ठिकाणी झाला. त्यांना वेद आणि उपनिषिदे यांचं ज्ञान होतं. 'एक जाति, एक धर्म, एक ईश्वर' असा नारा देत त्यांनी जातीय भेदाविरोधात आवाज उठवला. 

1857- ब्रिटिशांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली

ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात भारतात आवज उठवण्यात 1857 पासून सुरुवात झाली. मेरठमध्ये सुरु झालेलं हे बंड थोड्याच काळात उत्तर आणि पूर्व भारतात पसरले. तर ब्रिटिशांविरोधात 1857 साली पहिल्यांदा उठाव झाल्यानंतर उठाव करणाऱ्या क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली होती.पण 20 सप्टेंबर 1857 ला ब्रिटीशांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली आणि बंड मोडून काढले. 

1878- द हिंदू वृत्तपत्राचे पहिले प्रकाशन

भारतातील नामांकित वृत्तपत्र असलेल्या द हिंदू या वृत्तपत्राला 20 सप्टेंबर 1978 रोजी सुरुवात झाली. सुरुवातीला साप्ताहिक असलेल्या या वृत्तपत्राचे नंतर दैनिकामध्ये रुपांतर झालं. द हिंदूने आजवर देशातील अनेक महत्त्वाच्या घटनांना वाचा फोडली आहे.

1932- ब्रिटिशांच्या जातीय निवाड्याविरोधात गांधीजींचे आमरण उपोषण सुरू

16 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी भारतीय दलित समाजासाठी विभक्त मतदारसंघांची तरतूद असणाऱ्या जातीय निवाड्याची घोषणा केली. तिसऱ्या गोलमेज परिषेदेमध्ये जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्यामुळे त्यांनी हा जातीय निवाडा घोषित केला. यामुळे भारतातील  दलित समाज हिंदू समाजापासून विभक्त होण्याचा भीती होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या या उपोषणाला पुढील काळात यश देखील आलं. 

1946- फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात

75 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. फ्रान्समधील रिसॉर्ट शहरात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या पहिल्या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील 21 चित्रपट दाखवण्यात आले होते. कान्स फिल्म फेस्टिवल हा जगातील एक प्रतिष्ठेचा फिल्म फेस्टिवल समजला जातो. दरवर्षी होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये जगभरातील काही निवडक चित्रपट, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म दाखवण्यात येतात. 

1996-  मराठी साहित्यिक दया पवार यांचे निधन

मराठीतील दलित साहित्याचे अग्रणी साहित्यिक म्हणून दया पवार यांचे ख्याती होती. दया पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार असे होते. त्यांनी जागल्या या टोपणनावानेही लेखन केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील धामणगावामध्ये त्यांचा जन्म झाला. तर संगमनेरमध्ये त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पवार यंच्या बलुतं या आत्मकथेचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या भाषांमध्येही या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले. या पुस्तकामुळे मराठी साहित्यामध्ये दलित साहित्याची वाट निर्माण करुन देण्यास मदत झाली होती. तर त्यानं पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. कोंडवाडा, चावडी, जागल्या, धम्मपद यांसारख्या कथासंग्रहाची दया पवार यांनी रचना केली. तर 20 सप्टेंबर 1996 रोजी त्यांचे निधन झाले. 

2015: उद्योगपती जगमोहन दालमिया यांचे निधन

भारतीय क्रिकेट निमायक मंडळ अर्थातच बीसीआयचे अध्यक्षपद भूषवलेले उद्योगपती जगमोहन दालमिया यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. दायमिया हे मूळचे राजस्थानचे होते पण बराच काळ ते कुटुंबियांसोबत कोलकाता येथे वास्तव्यास होते. त्यांनी आल्या कारकिर्दीची सुरुवात ही यष्टीरक्षक म्हणून केली होती. तर त्यांनी  कलकत्ता येथील एका आघाडीच्या क्रिकेट क्लबसाठी फलंदाजी करण्यास देखील सुरुवात केली. तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी कौटुंबिक व्यावसायाची धुरा सांभळण्यास सुरुवात केली. 

इतर महत्त्वाच्या घडामोडी

1897: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म.
1922: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.
1949: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.
1997: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget