एक्स्प्लोर

Morning Headlines 20th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

India vs Australia World Cup Final Analysis: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया, फायनलमध्ये मात्र सपशेल फ्लॉप, कशी? 'ही' 5 सर्वात मोठी कारणं!

India vs Australia, World Cup Final Analysis: आयसीसी विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं (Team India) अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलेला. अशा परिस्थितीत टीम इंडियाच विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात टीम इंडिया विजयी पताका फडकवणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होताच, पण कांगारूंनी  विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला रोखलं आणि विश्वचषकावर (World Cup Final Win By Australia) नाव कोरलं. वाचा सविस्तर 

कभी-कभी लोग भूल जाते हैं! भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना फायनलचं आमंत्रणच नव्हतं, काँग्रेसकडून BCCI वर ताशेरे

ICC World Cup 2023, IND vs AUS : गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी (19 नोव्हेंबर 2023) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. आतापर्यंतचे सर्व विश्वचषक (World Cup 2023) विजेते कर्णधार वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात सहभागी झाले होते. पण, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव (Kapil Dev) मात्र अंतिम सामन्यासाठी उपस्थित नव्हते. यावरुन काँग्रेसनं (Congress) बीसीसीआयवर (BCCI) टीकास्त्र डागलं आहे. तसेच, स्वतः कपिल देव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर 

World Cup 2023 : विश्वचषकात भारताचा पराभव अन् पाकिस्तानला उकळी फुटली, पंतप्रधान मोदींचाही उल्लेख; पाक मीडियानं काय म्हटलं? जाणून घ्या...

IND vs AUS, World Cup 2023 Final : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर (IND vs AUS) विजय मिळवला. यंदाच्या विश्वचषकात सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारताला अंतिम सामन्यात मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने हा सामना चार विकेटच्या मोबदल्यात जिंकला आणि भारतीय खेळाडूंसह कोट्यवधी भारतीयांचा हिरमोड झाला. पराभवानंतर टीम इंडियाला भरमैदानात अश्रू अनावर झाले. भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानी मीडिया मात्र, खूश असल्याचं दिसत आहे. हेडने भारतीयांची मनं दुखावली, असं म्हणत 'द डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्रामध्ये विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा सविस्तर 

राष्ट्रवादी काकांना की पुतण्याला? निवडणूक आयोगात आजपासून घमासान, डे टू डे होणार सुनावणी

नवी दिल्ली: राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis)  पक्षात दोन गट पडले आहे.  राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी होणार आहे.अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढचे काही दिवस सुनावणी सलग होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार आज दिल्लीत (Sharad Pawar In Delhi) आहेत. त्यामुळे सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला! 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

Weather Forecast Today : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील हवामानात (Weather Update) बदल झाला आहे. राज्यासह (Maharshtra) देशात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये कोझिकोड, तिरुवनथपुरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर तर तामिळनाडूमध्ये नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात आजही पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर 

Uttarakhand Tunnel Accident : 192 तासांनंतरही बचावकार्य सुरुच, बोगद्यात अडकले 41 मजूर; टनलबाहेर नातेवाईकांचा आक्रोश

Uttarkashi News : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद केलेले सिल्क्यरा येथून ड्रिलिंग रविवारी दुपारी 4 वाजता म्हणजेच 50 तासांनंतर पुन्हा सुरू झालं. टनलमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी येथून आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाइप ड्रिल करण्यात आला आहे. या दुर्घटनेला आठ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. जसेजसे जास्त तास उलटत आहेत. तसतसं मजुरांचं मनोधैर्य खचत आहे. आमची लवकर सुटका करा, अशी मजुरांची मागणी आहे. वाचा सविस्तर 

20 November In History : प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी, प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांचे निधन; आज इतिहासात

 मुंबई : भारतात क्रिकेट हा खेळ पॅशन बनला आहे. देशातील क्रिकेटचा इतिहास दोनशे वर्षांहून अधिक जुना आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघाने 25 जून 1932 रोजी लॉर्ड्सवर पहिला कसोटी सामना खेळला आणि भारत कसोटी क्रिकेट खेळणारा सहावा देश बनला. आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताचा दबदबा असला तरी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला द्विशतक झळकावायला 23 वर्षे लागली. देशासाठी पहिले द्विशतक झळकावण्याचे श्रेय पॉली उमरीगरकडे आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या आधी सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या बॅटने अनेक विक्रम रचले. वाचा सविस्तर 

Horoscope Today 20 November 2023 : आजचा सोमवार 12 राशींसाठी कसा असेल? मेष ते मीन राशीचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 20 November 2023 : आज 20 नोव्हेंबर 2023 सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीने हे काम यशस्वी करू शकता. सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. हवामानात थोडासा बदल झाल्याने खोकला आणि सर्दी होऊ शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari :  विठुरायासाठी खास रेशमी पोशाखShankaracharya Special Report : शंकराचार्यांच्या प्रतिक्रियेवर कुणाचं काय मत?Narayan Survey Special Report : नारायण सुर्वेंचा फोटो पाहताच चोराचा माफीनामाTop 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Kamathipura : कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा पाडण्यास हायकोर्टाची परवानगी, भाडेकरुंना दिलासा देण्यास नकार
वरळी अपघातातील  मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी ट्रीटमेंट, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
Video : माझा राजा रं... विशाळगडावर शाहू महाराजांनी अंगावरील जॅकेट काढलं, पावसात भिजणाऱ्या चिमुकलीला घातलं; लाखोंचं मन जिंकलं
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
पूजा खेडकर यांच्यासारखे लोकं राजकारणातही नसतात; आदित्य ठाकरेंची रोखठोक कमेंट
Embed widget