एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 1st November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

LPG Price Hike: ऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ, मुंबईतील दर काय?

LPG Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजीच्या दरांत (LPG Price) तब्बल 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder Rate) किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव  खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं तुमच्यासाठी महाग होणार आहे. वाचा सविस्तर 

PM Modi : पंतप्रधान मोदींची तरुणांना मोठी भेट! 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच; अमृत कलश यात्रेचा समारोप

PM Modi Launched Mera Yuva Bharat Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळीपूर्वी तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी 'मेरा युवा भारत पोर्टल' लाँच केलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी हे पोर्टल लाँच केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात 'मेरा युवा भारत पोर्टल' व्हर्च्यूअली (Virtually) लाँच केलं. 'माती मेरा देश' मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत कलशात माती अर्पण केली. वाचा सविस्तर 

वानखेडेवर 'क्रिकेटचा देव' अवतरणार! 10 फूट उंची, 4 फुटांची बॅट, तर जगाची झलक असलेला बॉल; आज सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: मुंबई : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील (Mumbai News) वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. तब्बल 22 फूट उंचीचा हा पुतळा असणार आहे. सचिनचा पुतळा तयार करण्यासाठी त्याची कोणती पोझ घ्यायची यावर बरीच चर्चा झाली आणि संपूर्ण चर्चेतून सुवर्णमध्य साधत सचिनची सिक्स मारतानाची पोझ निश्चित करण्यात आली. वाचा सविस्तर 

Israel Hamas War : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला फंडींग कुठून मिळते? बजेट ऐकून थक्क व्हाल; मोसादच्या माजी एजंटचा गौप्यस्फोट

Israel Hamas War : हमास आणि इस्रायल (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाचा वणवा थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासकडून एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. हमास-इस्रायल युद्धादरम्यान काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामधील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हमासच्या निधीबाबत आहे. हमासला निधी नक्की मिळतो कुठून असा सवाल उपस्थित होत आहे. आता मोसादच्या एका माजी एजंटने हमासला मिळणाऱ्या निधीबाबत गौप्यस्फोट केला आहे. मोसाद (Mossad) ही इस्रायल सरकारची गुप्तचर यंत्रणा आहे. वाचा सविस्तर 

China Birth Rate : चीनसमोर नवं संकट! मुले जन्माला घालण्यास घाबरतायत महिला; शी जिनपिंग यांच्या वक्तव्यानेही वेधलं लक्ष

China Birth Rate Declined : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीन (China) समोर एक नवीन चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनमध्ये प्रजनन दरात (Birth Rate) मोठी घसरण झाली आहे. एकीकडे चीनची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत आहे, तर दुसरीकडे चीनचा प्रजनन दर देखील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. घटत्या लोकसंख्येमुळे चीन सरकार चिंतेत आहे. चीनमध्ये 2022 मध्ये जन्म दरात विक्रमी घाट नोंदवण्यात आली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी जन्मलेल्या बालकांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट झाली. चिनी महिला आता मुले जन्माला घालणं टाळत असल्याचं अलीकडच्या ट्रेंडमध्ये दिसून आले आहे. वाचा सविस्तर 

1 November In History : विनोदी अभिनेते शरद तळवळकर यांचा जन्म, मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती; आज इतिहासात

मुंबई : आजचा दिवस इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारतात सहा राज्यांची स्थापना करण्यात झाली होती. तसेच विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.  द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती 1956 करण्यात आली होती. कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन झाले होते. जाणून घेऊयात आजच्या इतिहासात महत्त्वांच्या घटनांबाबात... वाचा सविस्तर 

Horoscope Today 1 November 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस फलदायक! पाहा 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 1 November 2023 : राशीभविष्यानुसार आज (Horoscope Today) म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023, बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज करवा चौथचं व्रत पाळलं जाणार आहे. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today 1 November 2023) जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget