एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

LPG Price Hike: ऐन सणासुदीत महागाईचा विळखा; एलपीजीच्या दरांत 103 रुपयांची वाढ, मुंबईतील दर काय?

LPG Price Hike: दिवाळी तोंडावर आली असताना एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महागाईनं आधीपासूनच पिचलेल्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा झटका आहे.

LPG Price Hike: ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून एलपीजीच्या दरांत (LPG Price) तब्बल 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder Rate) किमतींत ही वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या दरांत वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव  खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल. म्हणजेच, आजच्या दरवाढीमुळे बाहेर खाणं तुमच्यासाठी महाग होणार आहे. 

कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतींत वाढ 

आज, 1 नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते. 

गेल्या महिन्यातही व्यावसायिक एलपीजीचे दर वाढले 

गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतींत 209 रुपयांनी वाढ करून लोकांना मोठा धक्का दिला होता. यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1731.50 रुपयांवर आली. सलग दुसऱ्या महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजीच्या किमतींत वाढ केली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही 

1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो जुन्याच दरांवर कायम आहे. देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांवर नजर टाकल्यास, 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना मिळतो.

19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये फरक काय?

हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rule Change from 1 November : आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम; GST संदर्भातील नियमातही बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Lok Sabha Election Results 2024 : तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवानाDevendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्लीवारीआधी मुंबई सागर बंगल्यावर नेत्यांचे मनधरणीचे प्रयत्नTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 06 June 2024Ajit Pawar NCP Meeting : महायुतीचा पराभव, राष्ट्रवादीत धाकधूक; दादांसमोर आमदार वाचणार अडचणींचा पाढा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Sangli Lok Sabha: अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
अपक्ष विशाल पाटील, विश्वजीत कदम मुंबईकडे रवाना, मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! नैर्ऋत्य मोसमी पावसाचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Lok Sabha Election Results 2024 : तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
तिसऱ्या टर्मला आघाडी सरकारची वेळ; मोदींनी एनडीएमधील पक्षांसोबत डील करण्यासाठी जबाबदारी दिली तरी कोणाला?
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Ajit Pawar: पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!
Premachi Goshta Serial Update : सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार;  'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
सागरसाठी मिहिर करणार मोठा त्याग, सावनीला तिच्या कृत्यावर मुक्ता सुनावणार; 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय पाहणार?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Embed widget